वडगाव शिंदोडीत बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:19 PM2017-08-18T14:19:48+5:302017-08-18T14:19:48+5:30

घबराटीचे वातावरण आहे.

wadgoan,shindodi,shreegonda,leopard | वडगाव शिंदोडीत बिबट्या

वडगाव शिंदोडीत बिबट्या

googlenewsNext
िसापूर : दीड महिन्यापासून वडगाव शिंदोडी (ता.श्रीगोंदा) भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याने या भागात घबराटीचे वातावरण आहे. पंधरा आॅगस्टला पहाटे पाचच्या सुमारास संतोष पवार यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. दारात झोपलेले त्यांचे वृद्ध वडीलही भयभीत झाले. या दोघांचा ओरडा ऐकून घरातील अन्य सदस्य बाहेर आल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी सोमनाथ पवार यांच्या गावालगतच्या घरानजीक बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले. उपवनसंरक्षक पी.लक्ष्मी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर वनखात्याने पिंजरा लावला. परंतु पंधरा दिवसानंतर येथून पिंजरा काढून बोरी शिवारात लावण्यात आला. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेतावर भरणी करायला जाण्यास धजावत नाहीत. बिबट्याचा वावर झाल्यापासून रानडुकरे गायब झाली आहेत. रानडुकरांपासून होणारे शेतीचे नुकसानही टळले आहे. मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त झाला आहे.---------------------------------------------------------------------------------------------------------बिबट्याला पकडण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यात दोन पिंजरे आहेत. त्यापैकी एक पिंजरा बोरी व दुसरा बाबुर्डी येथे आहे. एकच बिबट्या एका शिवारातून दुसºया शिवारात स्थलांतर करीत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागणीनुसार आहे त्याच पिंजºयापैकी एक पिंजरा बसविण्याची उपाय योजना करण्यात येईल. -अश्विनी दिघे,वनपाल,श्रीगोंदा

Web Title: wadgoan,shindodi,shreegonda,leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.