ग्रामस्थांसह तलाठ्याला डांबून वाळूचा डंपर पळविला : गोदावरी नदीपात्रातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 06:21 PM2018-05-26T18:21:13+5:302018-05-26T18:21:13+5:30

तलाठी व ग्रामस्थांना डांबून ठेवत वाळू तस्करांनी डंपर पळवून नेल्याची घटना गोदावरी नदीपात्रात सराला येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The villagers along with villagers escaped the sand dump: Godavari basin incident | ग्रामस्थांसह तलाठ्याला डांबून वाळूचा डंपर पळविला : गोदावरी नदीपात्रातील घटना

ग्रामस्थांसह तलाठ्याला डांबून वाळूचा डंपर पळविला : गोदावरी नदीपात्रातील घटना

googlenewsNext

श्रीरामपूर : तलाठी व ग्रामस्थांना डांबून ठेवत वाळू तस्करांनी डंपर पळवून नेल्याची घटना गोदावरी नदीपात्रात सराला येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी सराला शिवारात नदीपात्रातून तीन ब्रास वाळू असलेला डंपर चालला असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यांनी ट्रक अडवून तहसीलदार सुभाष दळवी व तलाठी डहाळे यांना माहिती दिली. तलाठी तात्काळ हजर झाले. त्याचवेळी तस्करांचा जमावही घटनास्थळी दाखल झाला. गुडू यादव, सनी बोरुडे, सर्फराज, डंपर चालक (क्रमांक सी. क्यू.-८७९७ ) या जमावाने ग्रामस्थ व तलाठी यांना डांबून ठेवत महसूलच्या ताब्यातील डंपर पळवून नेला. याबाबत तलाठी हेमंत शामराव डहाळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

Web Title: The villagers along with villagers escaped the sand dump: Godavari basin incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.