दोन मुख्यमंत्र्यांनी घेतले शनिदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क on Tue, January 02, 2018 4:29am

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनी शिंगणापूर येथे येऊन शनिदर्शन घेतले.

 नेवासा (जि. अहमदनगर) - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनी शिंगणापूर येथे येऊन शनिदर्शन घेतले. या वेळी दोन्ही मुख्यमंत्र्यांची समोरासमोर भेट झाल्याने त्यांनी गळाभेट घेऊन एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोमवारी घोडेगाव येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. तेथून मोटारीने शिंगणापूरला जाऊन त्यांनी शनी मंदिरातील उदासी महाराज मठात अभिषेक केला. नंतर चौथºयावर जाऊन शनी मूर्तीला तेल अर्पण करीत दर्शन घेतले. शिवराजसिंह चौहान यांचे सायंकाळी पावणेपाच वाजता आगमन झाले. दोन्ही मुख्यमंत्री आल्यामुळे अन्य भाविकांना तब्बल एक ते दीड तास बंद करण्यात आले होते.

संबंधित

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय; शिवसैनिक, पुणेकरांना मोठी भेट
स्टार सायकलपटू : कृष्णा हराळ
ठरले...! नारायण राणेंचा 'स्वाभिमान' लोकसभेच्या पाच जागा लढवणार
साडेतीन कोटींचा पी.एफ. थकविला : नगर तालुका बाजार समिती
बहुजन समाजाने आपापले मतभेद दूर ठेवावेत -आ. ह. साळुंखे

अहमदनगर कडून आणखी

बहुजन समाजाने आपापले मतभेद दूर ठेवावेत -आ. ह. साळुंखे
बल्हेगाव ते लंडन वारी
कालवेप्रश्नी अडवाआडवीची भूमिका योग्य नाही : राम शिंदे
प्यार किया तो डरना क्या...
स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटले : पांढरीपूल येथील घटना

आणखी वाचा