दोन मुख्यमंत्र्यांनी घेतले शनिदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 04:29 AM2018-01-02T04:29:25+5:302018-01-02T04:30:10+5:30

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनी शिंगणापूर येथे येऊन शनिदर्शन घेतले.

 Two Chief Minister Shankarshan took it | दोन मुख्यमंत्र्यांनी घेतले शनिदर्शन

दोन मुख्यमंत्र्यांनी घेतले शनिदर्शन

Next

 नेवासा (जि. अहमदनगर) - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनी शिंगणापूर येथे येऊन शनिदर्शन घेतले. या वेळी दोन्ही मुख्यमंत्र्यांची समोरासमोर भेट झाल्याने त्यांनी गळाभेट घेऊन एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोमवारी घोडेगाव येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. तेथून मोटारीने शिंगणापूरला जाऊन त्यांनी शनी मंदिरातील उदासी महाराज मठात अभिषेक केला. नंतर चौथºयावर जाऊन शनी मूर्तीला तेल अर्पण करीत दर्शन घेतले. शिवराजसिंह चौहान यांचे सायंकाळी पावणेपाच वाजता आगमन झाले. दोन्ही मुख्यमंत्री आल्यामुळे अन्य भाविकांना तब्बल एक ते दीड तास बंद करण्यात आले होते.

Web Title:  Two Chief Minister Shankarshan took it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.