पारनेरमध्ये ट्रक - दुचाकींचा विचित्र अपघात : ५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 04:48 PM2019-06-26T16:48:47+5:302019-06-26T16:48:53+5:30

पारनेरमधील वडझिरे येथे बेल्हे -पारनेर रोडवर तिहेरी अपघातामध्ये ५ जण जखमी झाले. ट्रक आणि दोन मोटरसायकल मध्ये हा अपघात झाला.

Truck in Parner - Bizarre Accident of Two Wheels: 5 injured | पारनेरमध्ये ट्रक - दुचाकींचा विचित्र अपघात : ५ जखमी

पारनेरमध्ये ट्रक - दुचाकींचा विचित्र अपघात : ५ जखमी

Next

लोणीमावळा : पारनेरमधील वडझिरे येथे बेल्हे -पारनेर रोडवर तिहेरी अपघातामध्ये ५ जण जखमी झाले. ट्रक आणि दोन मोटरसायकल मध्ये हा अपघात झाला.

वडझिरे येथील रावसाहेब हरकु चौधरी (वय -४५ वर्षे), संतोष फक्कड लंके (वय ३६ वर्षे), देवीभोयरे येथील संभाजी शिवाजी बेलोटे (वय ३५ वर्षे), जाधववाडी येथील धोंडीभाऊ जाधव (वय ५८ वर्षे), सुनिल दगडू जाधव (वय ४० वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. पारनेरवरुन बेल्ह्याच्या दिशेला जाणा-या ट्रकला ओव्हरटेक करणारी मोटरसायकल (एम.एच.१६ ए.झेड ६७२०) देवीभोयरे फाट्याकडून येणा-या मोटरसायकल (एम.एच.-१५ एल ७९५२) ला धडकली. पाठीमागून येणा-या ट्रकच्या चाकाखाली सापडली. समोरील मोटारसायकल बाजूच्या खड्ड्यामध्ये जावून पडली. मोटरसायकलवरील रावसाहेब चौधरी, संतोष लंके व संभाजी बेलोटे हे जखमी झाले. दुस-या मोटारसायकलवरील सुनिल जाधव व धोंडीभाऊ जाधव हे बसले होते.यामधे रावसाहेब चौधरी यांचा पाय गेलेला आहे.तर धोंडीभाऊ जाधव व रावसाहेब चौधरी हे गंभीर जखमी आहेत.
घटनास्थळी पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.

Web Title: Truck in Parner - Bizarre Accident of Two Wheels: 5 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.