मांडवे बुद्रूक गावच्या हद्दीत ट्रक व दुचाकीचा अपघात : एक ठार तर एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:14 AM2019-01-27T11:14:59+5:302019-01-27T11:15:51+5:30

संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक गावच्या हद्दीत मुळा नदीवरील पुलाजवळ ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण जखमी झाला.

Truck and bicycle accident in Mandwah Budhruk village: One killed and one injured | मांडवे बुद्रूक गावच्या हद्दीत ट्रक व दुचाकीचा अपघात : एक ठार तर एक जखमी

मांडवे बुद्रूक गावच्या हद्दीत ट्रक व दुचाकीचा अपघात : एक ठार तर एक जखमी

Next

बोटा : संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक गावच्या हद्दीत मुळा नदीवरील पुलाजवळ ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण जखमी झाला. हा अपघात शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास झाला असून त्यानंतर अज्ञातांनी हा ट्रक पेटवून दिला आहे.
शरद मच्ंिछद्र डोलनर (वय २५, रा. मांडवे बुद्रूक, ता. संगमनेर) असे या अपघातातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे तर विठ्ठल नामदेव बाचकर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात व्यक्तींनी ट्रक पेटवून दिला.

Web Title: Truck and bicycle accident in Mandwah Budhruk village: One killed and one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.