ट्रकच्या धडकेत संगमनेर तालुक्यातील टोलनाका कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:53 AM2018-06-16T11:53:01+5:302018-06-16T11:53:01+5:30

कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान येथील धोकादायक टोल नाक्याला रात्री अकराच्या दरम्यान (एम.एच.-१७ के. ५०९४) या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने धडक दिली. यामुळे टोल नाका कोसळला.

Tollaaka collapsed in Sangamner taluka of the truck | ट्रकच्या धडकेत संगमनेर तालुक्यातील टोलनाका कोसळला

ट्रकच्या धडकेत संगमनेर तालुक्यातील टोलनाका कोसळला

Next

संगमनेर : कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान येथील धोकादायक टोल नाक्याला रात्री अकराच्या दरम्यान (एम.एच.-१७ के. ५०९४) या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने धडक दिली. यामुळे टोल नाका कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही.
संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान येथील टोल नाका संगमनेर लोणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीकडे सदरचा टोलनाका चालविण्यास होता. राज्य शासनाने सदरचा टोल नाका बंद केल्याने सदर कंपनीने हा टोलनाका बंद केला. परंतु त्या रोडवर बांधलेला टोलनाका तसाच होता. टोलनाका अत्यंत मोडकळीस आला होता. रात्री अचानकपणे धडक बसल्याने टोलनाका कोसळला.

Web Title: Tollaaka collapsed in Sangamner taluka of the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.