विखेंची दादागिरी संपविण्याची हीच वेळ : संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:26 PM2019-04-26T12:26:43+5:302019-04-26T12:40:56+5:30

कॉँग्रेसकडून सत्तेची अनेक पदे ज्यांनी सांभाळली. अनेक वेळा स्वकियांना त्रास दिला.

This is the time of ending Dinkaji's death: Sangram Jagtap | विखेंची दादागिरी संपविण्याची हीच वेळ : संग्राम जगताप

विखेंची दादागिरी संपविण्याची हीच वेळ : संग्राम जगताप

Next

संगमनेर : कॉँग्रेसकडून सत्तेची अनेक पदे ज्यांनी सांभाळली. अनेक वेळा स्वकियांना त्रास दिला. सहकाराच्या माध्यमातून सगळीकडे हुकूमशाही राबविली. त्यांची दादागिरी संपविण्याची ही योग्य वेळ आहे. आम्ही दक्षिणेत योग्य इंजेक्शन दिले. आता तुम्ही उत्तरेत द्या, अशी टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ गुरूवारी तालुक्यातील जोर्वे येथे आयोजित सभेत जगताप बोलत होते. यावेळी शिवाजी दिघे, शांताबाई खैरे, विठ्ठल काकड, संपत थोरात, सुरेश थोरात आदी उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले, गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातत्याने सत्तेत राहून त्या परिवाराने अनेक पदे भोगली आहेत. पण निष्ठा त्यांनी कधी दाखवली नाही. वेळ आली तशी पाठ फिरवली आहे. यावेळेस दक्षिणेत त्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखविली आहे. आताही उत्तरेतील जनतेला संधी आहे. या घराण्याची दादागिरी हुकूमशाही कायमची संपवा. काँग्रेस पक्षाने कायम सर्वांना घेत विकासाचे राजकारण केले आहे. मात्र, याला हे घराणे अपवाद ठरले. यांनी पक्षाचे नाव वापरून स्वत:चा पक्ष तयार केला आहे. जिल्ह्यातून त्यांना कायमचे हद्दपार करायचे आहे. आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासारखा गरीब माणूस काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला आहे. साधा व सरळ माणूस आहे. त्यांना साधी, प्रामाणिक माणसे चालत नाहीत. विखे कुटुंबाची हाजीहाजी करणारेच लागतात म्हणून आमदार कांबळे यांच्याविरुद्ध हे उभे ठाकले आहेत. त्यांना अजिबात थारा देऊ नका. आमदार कांबळे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार आहेत. दक्षिणेत व उत्तरेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विजयी होतील. यामुळे या घराण्याचा पराभव नक्की असून हीच संधी चालून आली आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: This is the time of ending Dinkaji's death: Sangram Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.