तिसगाव नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 02:23 PM2018-05-30T14:23:33+5:302018-05-30T14:23:33+5:30

पाथर्डी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या तिसगावच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे महिनाभरापासून प्रादेशिक नळ योजनेचा पाणी पुरवठाच बंद झाला आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने तिसगावकर तहानले आहेत.

Till the water of Tisgaon tap water supply scheme reached the well | तिसगाव नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीने गाठला तळ

तिसगाव नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीने गाठला तळ

googlenewsNext
ठळक मुद्देटँकरने पाणी देण्याची पंचायत समितीकडे मागणी

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या तिसगावच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे महिनाभरापासून प्रादेशिक नळ योजनेचा पाणी पुरवठाच बंद झाला आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने तिसगावकर तहानले आहेत.
मूळ गावठाणातील पाचीआंबा नळयोजनेच्या विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे शहरवासियांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दहा हजारांपेक्षा जास्त लोकवस्तीच्या तिसगावची तहान भागविण्यासाठी मिरी-तिसगाव प्रादेशिक योजना पूर्ववत सुरू करावी, किंवा त्यासाठी टँकरने तरी पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. पाणी टंचाई तीव्र झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष खदखदत असून कोणत्याही स्वरुपात पाणी द्या, अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराच ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे पंचायत समितीला दिला आहे.
पाथर्डीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांची मंगळवारी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब लवांडे, अमोल वाबळे, वहाब इनामदार, माजी उपसरपंच इलियास शेख यांनी भेट घेऊन तिसगावच्या पाणी टंचाईचे गाºहाणे मांडले. तसेच गावातील पाणी परिस्थितीचे वास्तव मांडून तक्रारींचे लेखी निवेदनही दिले.

Web Title: Till the water of Tisgaon tap water supply scheme reached the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.