संगमनेरात अवैध मद्यविक्री करणा-या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:57 PM2018-02-20T14:57:41+5:302018-02-20T15:12:36+5:30

तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १७ हजार ५३५ रुपये किंमतीच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

Three persons arrested for illegal liquor selling in Sangamner | संगमनेरात अवैध मद्यविक्री करणा-या तिघांना अटक

संगमनेरात अवैध मद्यविक्री करणा-या तिघांना अटक

Next

संगमनेर : अवैध मद्यविक्री करणा-यांवर शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. पथकाने सोमवारी तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १७ हजार ५३५ रुपये किंमतीच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या घटनेत शहरानजीक असलेल्या कासारा दुमाला परिसरातील हॉटेल कल्पराज जवळील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला पोलिसांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात रामसिंग हेमसिंग सिंग (वय. ४५ रा. कासारा दुमाला, ता. संगमनेर) याच्याकडून १२ हजार ७३५ रूपये किंमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी फिर्याद दिली आहे.
दुस-या घटनेत मालदाड रोड परिसरातील हॉटेल सुयोगच्या उजव्या बाजूस विदेशी दारूची विक्री करणाºया सचिन प्रकाश साळुंखे (रा. मालदाड रोड, ता. संगमनेर) याच्याकडून ३ हजार ६०० रुपये किंमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही घटना साडेचार वाजेच्या सुमारास घडली़ साळुंखे विरोधात पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ यांनी फिर्याद दिली.
तिस-या घटनेत दिवटे किराणा स्टोअर्सच्या मागे संध्याकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात देशी मद्याच्या बाराशे रुपयांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे यांच्या फिर्यादीवरून अनिल बबन गायकवाड (वय. २८, रा. मालदाड रोड, ता. संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन ठिकाणी अवैध मद्यविक्री प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आशिष आरोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. जी. लांडे, पोलीस नाईक एम. आर. सहाणे हे तपास करीत आहेत.

 

Web Title: Three persons arrested for illegal liquor selling in Sangamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.