नगर जिल्ह्यात एटीएम फ्रॉडला बळी पडलेल्यांना मिळाले पैैसे; १ लाख १८ हजार खात्यात वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 07:44 PM2017-12-29T19:44:37+5:302017-12-29T19:48:04+5:30

बँक मॅनेजर बोलत असल्याचे सांगत नगर शहर व श्रीरामपूर येथील दहा जणांची आॅनलाइन फसवणूक करणा-या गुन्हेगारांचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश करत अर्जदारांना त्यांचे पैैसे परत मिळवून दिले आहेत.

Those who were victims of ATM fraud in Nagar district; 1 lakh 18 thousand accounts | नगर जिल्ह्यात एटीएम फ्रॉडला बळी पडलेल्यांना मिळाले पैैसे; १ लाख १८ हजार खात्यात वर्ग

नगर जिल्ह्यात एटीएम फ्रॉडला बळी पडलेल्यांना मिळाले पैैसे; १ लाख १८ हजार खात्यात वर्ग

Next
ठळक मुद्देकुणालाही एटीएम कार्डवरील क्रमांक सांगू नयेत.आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी कुणाला सांगू नये.एटीएमकार्डचा पीन क्रमांक कोठे लिहून ठेवू नये.एटीएमचा पीन टाकताना कुणाला दिसणार नाही याची खात्री करा.एटीएमकार्डमधून पैैसे काढताना कुणाची मदत घेऊन नका. क्रेडीट कार्ड व बँक स्टेटमेंट यांची नेहमी पडताळणी करा.एटीएमकार्डद्वारे फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क करा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी केले आहे.

अहमदनगर : बँक मॅनेजर बोलत असल्याचे सांगत नगर शहर व श्रीरामपूर येथील दहा जणांची आॅनलाइन फसवणूक करणा-या गुन्हेगारांचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश करत अर्जदारांना त्यांचे पैैसे परत मिळवून दिले आहेत.
सावेडी, बोल्हेगाव व श्रीरामपूर येथे बँक ग्राहकांना नोव्हेंबर व डिसेंंबर महिन्यात उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार येथील सायबर गुन्हेगारांनी फोन केला़ ‘बँकेचा मॅनेजर बोलतोय, तुमच्या डेबिट कार्डची व्हॅलिडिटी संपली आहे़ ते पुन्हा कार्यरत करण्यासाठी मला तुमच्या एटीएम कार्डवरील १६ अंकी नंबर व एटीएम कार्ड मागील सीव्हीव्ही सांगा व त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक ओटीपीचा मेसेज येईल ते सांगितल्यानंतर तुमचे एटीएम कार्ड पुन्हा सुरू होईल, असे सांगितले़ दहा जण या फसव्या कॉलला बळी पडले़ एटीएम क्रमांक व ओटीपी सांगितल्यानंतर गुन्हेगारांनी ग्राहकांच्या खात्यातील पैैसे त्यांच्या वॉलेटमध्ये वर्ग करून घेतले़ फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.
सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतीक कोळी, सहायक फौजदार सलीम पठाण, कॉन्स्टेबल वाव्हळ, पोलीस नाईक हाडके, राहुल गुंड, अरुण सांगळे, आकाश भैरट, प्रशांत राठोड आदींनी तांत्रिक तपास का्रून कोणत्या वॉलेटमध्ये हे पैैसे जमा करून घेतले, याचा शोध घेतला़ त्यानंतर संबंधित कंपनीच्या वॉलेट हेडशी संपर्क करून गुन्हेगारांच्या वॉलेटमध्ये जमा झालेले पैैसे परत अर्जदारांच्या खात्यावर वर्ग करून घेतले़ १ लाख १८ हजार ६२९ रक्कम सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तक्रारदारांना परत मिळाली.

Web Title: Those who were victims of ATM fraud in Nagar district; 1 lakh 18 thousand accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.