हिवरे बाजारच्या ग्रामसभेत विकासाचा ‘थर्टीफर्स्ट’! जिल्हाधिका-यांची उपस्थिती; विषमुक्तशेतीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क on Tue, January 02, 2018 3:57am

आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये ‘थर्टी फस्ट’ ग्रामसभेच्याद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गतवर्षीच्या विकासकामांचा आढावा, तर नव्या वर्षांच्या कामांचे नियोजन या ग्रामसभेत करण्यात आले. शाश्वत विकास, विषमुक्त शेती करून आरोग्याच्या दृष्टीने सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.

अहमदनगर : आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये ‘थर्टी फस्ट’ ग्रामसभेच्याद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गतवर्षीच्या विकासकामांचा आढावा, तर नव्या वर्षांच्या कामांचे नियोजन या ग्रामसभेत करण्यात आले. शाश्वत विकास, विषमुक्त शेती करून आरोग्याच्या दृष्टीने सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ ठाणगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभय महाजन उपस्थित होते. गतवर्षीच्या नियोजित २३ विषयांपैकी २२ विषय पूर्ण झाले असून पुढील वर्षासाठी प्रस्तावित कामांचा आराखडा ग्रामसेवक सचिन थोरात यांनी ग्रामस्थांपुढे चर्चेस मांडला. पोपटराव पवार यांनी पुढील वर्षीच्या विकास नियोजनासंदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधला. सामूहिक भोजनानंतर रात्री ग्रामस्थांनी नवीन वर्षाचे स्वागत फटाके वाजवून केले. याप्रसंगी अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आज हिवरेबाजारचे अनुकरण करण्याच्या दृष्टीने जगभरातील विविध क्षेत्रातील माणसे येथे सातत्याने भेट देत आहेत, असे कौतुकोद्गार जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी या वेळी काढले.

संबंधित

अश्लीलता आणि सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत - हायकोर्ट   
पुण्यात पावसाला दमदार सुरुवात
अतिरेक्यांना पैसा पुरविणाऱ्या रमेश शहाला पुण्यातून अटक
नोकरीच्या आमिषाने नेले आणि दगडफेकीस जुंपले, तरुणांनी सांगितली आपबीती 
निलम गाेऱ्हेंच्या घरी विषारी साप

अहमदनगर कडून आणखी

अभद्र राजकारण्यांचा ‘नगर पॅटर्न’ कशासाठी ? - डॉ. निलम गो-हे
मागासवर्गीय मुलांची १६ वसतिगृहे धोकादायक 
चिमुकल्या मुलाला पित्याने लावलं भीक मागायला
थकबाकी न भरल्याने केडगावात जप्तीची कारवाई : मालमत्तेचा होणार लिलाव
मोहट्याच्या सरपंचावरील ‘अविश्वास’ मंजूर

आणखी वाचा