टेम्पो चालकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:35 AM2019-04-17T11:35:21+5:302019-04-17T11:35:30+5:30

निवडणुकीचा पैसा घेऊन जाता काय? असे म्हणून मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी लातूर येथील टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून २० हजार रूपयाला लुटले.

Tempo driver robbed | टेम्पो चालकाला लुटले

टेम्पो चालकाला लुटले

Next

राहुरी : निवडणुकीचा पैसा घेऊन जाता काय? असे म्हणून मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी लातूर येथील टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून २० हजार रूपयाला लुटले. ही घटना १६ एप्रिल रोजी सकाळी राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द शिवारात घडली.
आनंद बाबासाहेब कदम (रा़.भातांगळी, जि. लातूर) हे टेम्पो क्लिनरसह १५ एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या कडील आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. ०९, सी.यू.५८०४ यामध्ये पशुखाद्य घेऊन राहुरीकडे चालले होते. १६ एप्रिल रोजी आनंद कदम हे त्यांच्याकडील टेम्पो घेऊन राहुरी तालुक्यातील राहुरी-वांबोरी रोड लगत खडांबे खुर्द शिवारात सकाळी नऊ वाजेदरम्यान आले. त्यांनी टेम्पो रोडच्या कडेला उभा केला असता दोन अज्ञात भामटे तोंडाला रूमाल बांधून विनानंबरच्या मोटरसायकलवर आले. ते टेम्पो चालक आनंद कदम यांना म्हणाले की, तुम्ही गाडीत निवडणुकीचा पैसा घेऊन जाता काय? असे म्हणून गाडीत घुसले. त्यानंतर चालकाला चाकूचा धाक दाखवत आनंद कदम यांच्या पाकिटातील १० हजार रुपये रोख, १० हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, लायसन्स असा सुमारे २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हिसकावून घटनास्थळावरून धूम ठोकली.
सदर चोरट्यांच्या मोटरसायकलच्या नंबर प्लेटवर लाल अक्षरात रावण असे नाव लिहिले होते, असे टेम्पो चालकाने सांगितले. या घटनेबाबत टेम्पो चालक आनंद बाबासाहेब कदम यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात रस्ता लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Tempo driver robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.