ज्युदोमध्ये ताकदीपेक्षा तंत्र महत्वाचे : आदित्य धोपावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 07:22 PM2019-01-19T19:22:51+5:302019-01-19T19:23:17+5:30

ज्युदो हा खेळ कुस्तीसारखा आहे. कुस्तीमध्ये पाय पकडून डाव टाकतात पण ज्युदोमध्ये कपडे पकडून डाव टाकावा लागतो.

Techniques are important in Judo's power: Aditya Dhopavkar | ज्युदोमध्ये ताकदीपेक्षा तंत्र महत्वाचे : आदित्य धोपावकर

ज्युदोमध्ये ताकदीपेक्षा तंत्र महत्वाचे : आदित्य धोपावकर

Next

अहमदनगर : ज्युदो हा खेळ कुस्तीसारखा आहे. कुस्तीमध्ये पाय पकडून डाव टाकतात पण ज्युदोमध्ये कपडे पकडून डाव टाकावा लागतो. ज्युदोमध्ये आपण पाय पकडू शकत नाही. शरीरिचा वरचा भाग पकडून डाव टाकावा लागतो. ज्युदोमध्ये बॅलन्स खूप लागतो. त्यामुळे ज्युदोमध्ये ताकदीपेक्षा तंत्र महत्वाचे असल्याचे मत आंतरराष्ट्रीय ज्युदोपटू आदित्य धोपावकर याने व्यक्त केले.
आदित्य धोपावकर आणि प्रशिक्षक प्रा. संजय धोपावकर यांची ‘लोकमत अहमदनगर’ या पेजवर लाइव्ह मुलाखतीत बोलत होते.
खेळाडूंसाठी खेलो इंडिया अतिशय चांगली स्पर्धा आहे. सरकारने खेलो इंडियाच्या माध्यमातून चांगला व्यासपीठ मिळत आहे. लहानपणीपासून वडीलांबरोबर जायचो. तेव्हापासूनच ज्युदो खेळू लागलो. वडील प्रशिक्षक असल्याने घरातून प्रोत्साहन मिळत आहे. ते माझ्या पाठीशी सातत्याने आहेत. मी खेळत गेलो. यश मिळत गेले.ाहिली स्पर्धा नाशिकमध्ये खेळलो. तेव्हा पहिल्यांदा हरलो होतो. त्यानंतर कधीच हरलो नाही. त्यानंतर सातत्याने चार वर्षे महाराष्ट्रात टॉप राहिलो. शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत ५ सुवर्ण, खुल्या राज्यस्तरीय १० सुवर्णपदके मिळविली. राष्ट्रीय स्पर्धेत ५ ब्राँझ आणि २ सिल्व्हर मिळविले. राष्ट्रीय असोसिएशन ३ गोल्ड, १ सिल्व्हर पदके मिळविले. पुण्यात झालेल्या खेलो इंडियात गोल्ड मिळवायचे होते. मात्र सेमीफायनलाला दुखापत झाली. त्यामुळे ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. यामुळे यश मिळत आहे. गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या स्पर्धेतही चांगल्या स्पर्धा पार पडल्या. तेव्हाही ब्राँझपदक पटकावले. प् कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याने खूप काही शिकलो, असे आदित्य धोपावकर म्हणाले.

ज्युदोला ग्लॅमर मिळावे : प्रा. संजय धोपावकर
आदित्य सुरुवातीला कुस्ती खेळायचा. मात्र त्याची आवड ज्युदोमध्ये असल्याने तो ज्युदोकडे वळला. मीही त्याला मार्गदर्शन करत राहिलो. स्पर्धामध्ये सहभाग घेतला. पदके मिळायला लागली. त्याची आवड वाढतच गेली. घरामध्ये त्याच्यासोबत २४ तास असल्यामुळे लक्ष्य राहते. सातत्याने आपण मार्गदर्शन करावे लागते. आता आंतरराष्ट्रीय कोचकडे पाठविण्याची वेळ आली आहे. ज्युदो खेळाला आज ग्लॅमर नाही. प्रायोजक मिळत नाहीत ही शोकांतिका आहे. मात्र आज जिल्ह्यातील ग्रामीण भागात खेळला जात आहे. कर्जतमधील सोनाली मंडलिक आज ज्युदो खेळत आहे.

Web Title: Techniques are important in Judo's power: Aditya Dhopavkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.