Taor Shopping Center in Nagar taluka starts: Line closure for sale by online | नगर तालुक्यात तूर खरेदी केंद्र सुरू : आॅनलाईनमुळे विक्रीसाठी लाईन बंद
नगर तालुक्यात तूर खरेदी केंद्र सुरू : आॅनलाईनमुळे विक्रीसाठी लाईन बंद

केडगाव : मागील वर्षापासून नगर तालुका बाजार समितीत तूर, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाले आहे. या मार्केटमध्ये जिल्ह्यामधून शेतीमाल येत आहे . चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी जिल्हाभरातून विक्रीसाठी येत आहेत . आता आॅनलाईन सुविधेमुळे शेतक-यांना लाईन मध्ये थांबण्याची गरज पडणार नाही . सरकारने आॅनलाईनचा निर्णय चांगला घेतला यामुळे शेतक-यांचा वेळ व पैसा वाचला, असे प्रतिपादन अक्षय कर्डिले यांनी केले.
नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथे तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते . यावेळी सभापती विलास शिंदे, रेवणनाथ चोभे ,सचिव अभय भिसे , दिलीप भालसिंग , हरिभाऊ कर्डिले , बाबासाहेब जाधव , संतोष कुलट , संतोष म्हस्के , बन्सी कराळे , श्रीकांत जगदाळे बाबा आव्हाड आदी उपस्थित होते. यावेळी कर्डिले म्हणाले, मागील वर्षी जास्त शेतमालाची आवक आल्यामुळे बारदान्याचा प्रश्न निर्माण झाला होता . मात्र यंदा बारदान्याची अडचण येणार नाही . आतापर्यंत ७७५ गोण्याची नोंद झाली आहे . तूर खरेदी सुरू झाली आहे . ज्या शेतक-यांचा नंबर येईल त्यांना मोबाईलवर मेसेज येणार आहे . तेव्हाच शेतक-यांनी आपला शेतमाल घेऊन यावा .आ. शिवाजी कर्डिले यांनी शेतक-यांसाठी तूर खरेदी केंद्राचा निर्णय घेतला आहे असे अक्षय कर्डिले यांनी सांगितले .
चोभे म्हणाले, महाराष्ट्र शासनाकडून शेतक-यांसाठी बाजार समितीच्या वतीने तूर आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले .ज्या शेतक-यांनी मागील महिन्यात नोंद केली आहे . त्यांना मेसेज येणार आहे . त्या शेतक-यांनी आपला माल लगेच घेऊन यावा . मालाला चांगली गुणवत्तेसाठी क्लिंनिंग मशीनची व्यवस्था करणार आहोत . तेव्हा शेतक-यांनी चांगला माल घेऊन यावा . 


Web Title: Taor Shopping Center in Nagar taluka starts: Line closure for sale by online
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.