शिर्डी येथील द्वारकामाईत साईबाबा प्रकटल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 07:42 PM2018-07-12T19:42:18+5:302018-07-12T19:42:38+5:30

द्वारकामाईत साईबाबांची प्रतिमा अवतरल्याची चर्चा बुधवारी मध्यरात्री शिर्डीत पसरली. आधी लोकांमध्ये असलेली ही चर्चा नंतर सोशल मीडियावरून थेट जगातील साईभक्तांपर्यंत पोहोचली. त्यामुळे साईभक्तांसह अवघ्या शिर्डीकरांची द्वारकामाईत दर्शनासाठी गर्दी लोटली होती.

Talk about Saibaba revealed at Dwarkamai in Shirdi | शिर्डी येथील द्वारकामाईत साईबाबा प्रकटल्याची चर्चा

शिर्डी येथील द्वारकामाईत साईबाबा प्रकटल्याची चर्चा

googlenewsNext

शिर्डी : येथील द्वारकामाईत साईबाबांची प्रतिमा अवतरल्याची चर्चा बुधवारी मध्यरात्री शिर्डीत पसरली. आधी लोकांमध्ये असलेली ही चर्चा नंतर सोशल मीडियावरून थेट जगातील साईभक्तांपर्यंत पोहोचली. त्यामुळे साईभक्तांसह अवघ्या शिर्डीकरांची द्वारकामाईत दर्शनासाठी गर्दी लोटली होती. गर्दीला आवर घालण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्याही नाकीनऊ आले.
साईबाबांच्या आगमनापासून निर्वाणापर्यंतचे वास्तव्य द्वारकामाई मशिदीत घडले. त्यांनी अखेरचा श्वासही येथेच घेतला. त्यामुळे भक्तांच्या दृष्टीने द्वारकामाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजवर या मंदिरात अनेकदा चमत्कार म्हणाव्या, अशा घटना घडल्याचे सांगितले जाते. बुधवारी मध्यरात्री गुरूवारचा शुभारंभ होताना द्वारकामाईतील कोपऱ्यात काही भाविकांना बाबांचा चेहरा दिसल्याची चर्चा सुरू झाली. हा कोपरा बाबांच्या हयातीपासून आहे. या कोपºयात बाबा दिवा लावत होते. आजही या कोप-याला पुजारी रोज हार घालतात. नेमके याच ठिकाणी बाबांचे दर्शन झाल्याची चर्चा सुरू झाल्याने उत्सुकतेपोटी अनेकांनी याठिकाणी धाव घेतली. यापूर्वीही येथे सार्इंची प्रतिमा दिसल्याचे सांगितले जाते. याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू असतानाच बघता बघता ही वार्ता शहरात पसरली. यानंतर काही क्षणातच द्वारकामाई परिसर भाविकांनी खचाखच भरून गेला. गर्दी नियंत्रणात आणताना सुरक्षा रक्षकांना नाकीनऊ आले. साईनामाने अवधी साईनगरी भल्या मध्यरात्री दुमदुमली होती. अनेकांनी या दृश्याचे चित्रीकरण केले. छायाचित्रे काढली. काही क्षणातच ही घटना सोशल मीडियातून व्हायरल झाली. गुरूवारी सकाळपर्यंत जगभरातील लाखो भाविकांपर्यत ही घटना पोहोचली. सकाळीही द्वारकामाईत नेहमीपेक्षा अधिक मोठ्या रांगा लागल्या होत्या. सार्इंच्या या प्रतिमेचे दर्शन बुधवारी रात्री साडेअकरा ते साडेबारा असे तासभर घडले. त्यानंतर ही प्रतिमा विरळ होत नाहीशी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सध्या साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष सुरू असून शेवटचे शंभर दिवस शिल्लक आहेत. याच काळात ही घटना घडल्याने आगामी काळात भाविकांचा ओघ वाढण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Talk about Saibaba revealed at Dwarkamai in Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.