जिल्हाभरातील ८७८ धान्य दुकानदारांवर पुरवठा विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 04:09 PM2018-05-24T16:09:46+5:302018-05-24T16:09:46+5:30

निर्धारित नियतनापेक्षा कमी धान्य वितरण केल्याच्या कारणावरून जिल्हा पुरवठा विभागाने तब्बल ८७८ स्वस्त धान्य दुकानदारांवर धडक कारवाई केली आहे. यात सात दुकानांचे परवानेदेखील निलंबित करण्यात आले आहेत.

Supply department's action on 878 grain shoppers around the district | जिल्हाभरातील ८७८ धान्य दुकानदारांवर पुरवठा विभागाची कारवाई

जिल्हाभरातील ८७८ धान्य दुकानदारांवर पुरवठा विभागाची कारवाई

Next
ठळक मुद्देधान्य वितरणात अनियमितपणा सात दुकानांचे परवाने निलंबित

अहमदनगर : निर्धारित नियतनापेक्षा कमी धान्य वितरण केल्याच्या कारणावरून जिल्हा पुरवठा विभागाने तब्बल ८७८ स्वस्त धान्य दुकानदारांवर धडक कारवाई केली आहे. यात सात दुकानांचे परवानेदेखील निलंबित करण्यात आले आहेत.
प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी जितेंद्र इंगळे यांनी ही कारवाई केली. जिल्ह्यात एकूण १८८१ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यामार्फत ६ लाख लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात एकूण १७ हजार ५०० मेट्रिक टन धान्य वाटप केले जाते. परंतु एप्रिल २०१८ मध्ये केवळ साडेचार लाख लाभार्थ्यांनाच धान्य वाटप झाल्याचे निदर्शनास आले. यात पॉस मशिनद्वारे लाभार्थ्यांना कमी धान्य दिले गेले. ७० टक्केपेक्षा कमी धान्यवाटप करणाऱ्या अशा १ हजार १४३ धान्य दुकानदारांना नोटिसा देऊन इंगळे यांनी त्यांच्याकडून दि. १९ मे पर्यंत लेखी खुलासा मागवला होता. त्यावर दुकानदारांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे पुरवठा विभागाने कारवाईचे पाऊल उचलले.
केवळ २० ते ५० टक्के धान्य वितरण करणाºया ३५ दुकानदारांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली. ५० ते ७० टक्क्क््यांपर्यंत धान्य वाटप करणाºया ३१५ दुकानदारांची ५० टक्के अनामत जप्त झाली. तर केवळ शून्य ते पाच टक्केच धान्य वाटप करणाºया सात धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले. १६५ दुकानदारांचे खुलासे समाधानकारक आढळले.

परवाने निलंबित झालेली दुकाने
एच. ई. बोर्डेकरिता गोंडेगाव विकास सोसायटी, श्रीरामपूर. सुरभी महिला बचत गट, अशोकनगरकरिता वडाळा विकास सोसायटी, श्रीरामपूर. वडगाव शिंगोडी, अध्यक्ष किसान क्रांती महिला बचत गट, श्रीगोंदा. अध्यक्ष श्रीगोंदा सहकारी दूध उत्पादक संस्था, श्रीगोंदा. अलका दत्तात्र्यय हिरणवाळे, श्रीगोंदा. ए. आर. गुंदेचा, नगर शहर. अध्यक्ष विश्वंभरी औद्योगिक संस्था नगर शहर.
 

 

Web Title: Supply department's action on 878 grain shoppers around the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.