लोकमत न्यूज नेटवर्ककोपरगाव (जि. अहमदनगर) : शहरातील एका तरूणाने घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संजयनगर भागात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पोलिसांची माहिती अशी, शहरातील संजयनगर भागामध्ये बैलबाजार रोडवर राहणाºया सेवक साहेबराव पाखरे (वय २५) या तरूणाने गुरूवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरासमोरील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे लक्षात आल्यावर मृतदेह खाली घेऊन ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान याप्रकरणी ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रमेश भालेराव करीत आहेत.