अण्णांच्या समर्थनार्थ व सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:34 PM2018-03-24T13:34:21+5:302018-03-24T13:34:21+5:30

लोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न, निवडणूक सुधारणा या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रामलीला मैदानात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

 Stop the road in support of Anna and protest against the government | अण्णांच्या समर्थनार्थ व सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको

अण्णांच्या समर्थनार्थ व सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको

googlenewsNext

अहमदनगर : लोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न, निवडणूक सुधारणा या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रामलीला मैदानात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व सरकारच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी १० वाजता पारनेर - शिरूर मार्गावर रास्ता रोको केला. तब्बल १ तास रस्ता अडवून ग्रामस्थांनी सरकारचा निषेध केला.
दरम्यान सरकारचे अण्णांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ दिवसभर घंटानाद आंदोलन करणार आहेत. यावेळी उपसरपंच लाभेष औटी, माजी सरपंच जयसिंग मापारी, रमेश औटी, सुभाष पठारे, रोहिदास पठारे, अरुण भालेकर, माधवराव पठारे, बाळासाहेब पठारे, भिमराव पोटे, माजी सरपंच मंगल मापारी, प्रभावती पठारे, हिराबाई पोटे, संगीता पठारे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Web Title:  Stop the road in support of Anna and protest against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.