नगरमधील नेहरूंच्या पुतळ्यासमोरील माईक चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:09 PM2017-11-13T12:09:46+5:302017-11-13T12:10:58+5:30

Stole the Mike with Nehru's statues in the city | नगरमधील नेहरूंच्या पुतळ्यासमोरील माईक चोरीला

नगरमधील नेहरूंच्या पुतळ्यासमोरील माईक चोरीला

googlenewsNext

अहमदनगर : भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखले जाते. १४ नोव्हेंबरला त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. मात्र पंडित नेहरू यांचा प्रशासनाला विसर पडला आहे. अहमदनगर येथील लाल टाकी टेकडीवर असलेल्या त्यांच्या पुतळ्यासमोरील माईक चोरीस गेला असून, परिसर कचरामय बनला आहे.
शहरातील लाल टाकी येथे पंडित नेहरू यांचा पुतळा उभारलेला आहे. या ठिकाणी पूर्वी गुलाबाची बाग, कारंजा, धबधबा होता. आज मात्र सर्व काही अस्तित्वहीन झाले आहे.
सर्व परिसर कचरामय झाला आहे. मोठ्या दिमाखात उभ्या असणा-या पंडितजींच्या पुतळ्याच्या हातातील माईक गायब झाला आहे. तसेच चौथ-याच्या फरश्याही निखळल्या आहेत. कंपाउंड तुटले आहे. पुतळ्याच्या शेजारी झुडपाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

Web Title: Stole the Mike with Nehru's statues in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.