ठळक मुद्देयाचक :  नाट्यसमीक्षण

नवनाथ खराडे

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: नाटक सादर करण्यासाठी  सर्वात महत्वाची बाब म्हणजे संहिता.  संहितामध्येच तारतम्यता, नीटनेटकेपणा  नसेल तर सादरीकरणा रटाळ बनते. सस्पेन्स कधीच हातातून निघून गेल्यामुळे  प्रेक्षकही नाटक कधी संपण्याची वाट पाहतो. या नाटकातून नेमके काय सांगायचे हा प्रश्न प्रश्नच राहतो. नाथा, गोदी यांनी साकारलेल्या ताकदीच्या भुमिका अन नेपथ्य या नाटकाच्या जमेच्या बाजूचा उल्लेख करता येईल.

राज्य नाट्य स्पर्धेच्या अहमदनगर केंद्रावरील प्राथमिक फेरीस याचक या नाटकाने सुरुवात झाली. निर्मिती श्रीरामपूरच्या सार्थक बहुउद्देशीय संस्थेने केली आहे. लेखन प्रल्हाद जाधव तर दिग्दर्शन संदीप कदम यांनी केले आहे.

नाटकाची सुरुवात मुख्यमंत्री (दिप्तेश विसपुते) यांच्या वाढदिवसापासून होते.  समुद्रकिनारी असणा-या अलिशान घरात वाढदिवस साजरा होतो. या ठिकाणी अचानक एक भिकारी नाथा येतो. मुख्यमंत्री त्यास जेवण देतात. तो बराच वेळ बसतो. यादरम्यान भिकारी आणि मुख्यमंत्री यांच्यात चांगल्याच गप्पा रंगतात. तो  भिकारी वर्गाची व्यथा मुख्यमंत्र्याना सांगतो,  मागण्याही करतो.  मुख्यमंत्रीही भिका-याला राज्यात केलेला केलेला विकासासह लवकरच जागतिक बँकेची मदत मिळणार असल्याचे सांगतात. केंद्रात बोलावणी आल्याचे सांगतात. तसेच भविष्यात पंतप्रधान होणार असल्याचेही भिका-यास सांगतात. या संवाद सुरु असताना डांगे पोलिस हवालदार येतो. भिका-यास हाकलवण्याचा प्रयत्न करतो. मात्र मुख्यमंत्री त्यास थांबवितात. त्यानंतर भिका-याजवळ एक कागद सापडतो. मुख्यमंत्री खुनी असल्याचे छापून आल्याचे असते. त्यावर भिकारी आपण खुनी असल्याचे सांगतात.  हे मिडीयाचे अन विरोधकांचे कारस्थान असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. एवढ्यात डांगे एका वेशाला हाकलवून लावत असतो. येथे मध्यांतर होतो.

मध्यतरानंतर नाटक सुरु होते. त्यावेळी गोदी वेशा वाचवण्याची विनवणी करते. त्यावेळी मुख्यमंत्री पोलिस शिपायास सोडण्यास सांगतात. गोदी  मुख्यमंत्र्याजवळ थांबते. वेशा व्यवसायाची पाळेमुळे मुख्यमंत्र्यास सांगते.  मुख्यंमंत्र्याला ती ओळखीची वाटते. गोदी ही मुख्यमंत्र्याची कॉलेज जीवनातील प्रेयसी विशाखा असते. या दरम्यान च्या अनेक बाबींचा उहापोह येथे होतो. मुख्यंत्र्यांनी विशाखास कॉलेज जीवनात धोका दिलेला असतो. या उहापोहानंतर ती तेथून निघून जाते. जवळच भिकारी नाथा असतो. गोदी ही नाथाची बायको असते. दोघांच्या प्रेमाचा अंक येथे सुरु होतो. त्यानंतर मुख्यमंत्र्याच्या घरासमोर अचानकपणे मरते. मुख्यमंत्री येऊन पाहतात. हाताची नाडी चेक करतात. नाथाला गोदी मेल्याचे सांगतात. याचदरम्यान गोदीची इच्छा पुर्ण न झाल्याचे नाथा सांगतो. आणि या शेवटच्या इच्छेपोटी  मुख्यमंत्री स्वत खूनी असल्याचे सांगतात. कॉलेजात अमोल बर्वेचा मी मुद्दाम खून केल्याचे सांगतात. याचवेळी नाथा आम्ही भिकारी नसल्याचे सांगत, हे स्टिंग असल्याचे सांगतो. येथे कँमेरे लावण्याचे सांगून हे प्रसारण लाइव्ह सगळे पाहत आहेत. सीबीसी  चँनेलचे आम्ही प्रतिनिधी असल्याचे नाथा सांगतो. मेलेली गोदीही उठते. आम्ही पुन्हा एकदा मुख्यंत्र्यांच्या रटाळ संभाषणानंतर नाटक संपते. मात्र त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात.

नाटकातील भिकारी नाथा याची भुमिका विनोद वाघमारे यांनी साकारली आहे. अप्रतिम अशी भिका-याची भुमिका साकारली आहे. तसेच गोदीची भुमिकाही रेखा निर्मळ यांनी ताकदीने पेलली आहे. मुख्यमंत्र्याच्या भुमिकेमध्ये सातत्याने उणिवा जाणवतात. संपुर्ण नाटकात केंद्रस्थानी असलेले मुख्यमंत्री दिप्तेश विसपुते यांना भुमिकेला न्याय देता आला नाही. पीए शांतारामची भुमिका साकारणारे  नानासाहेब कर्डीले हेही कायमत अडखळतात. डांगे हवालदाराची भुमिका हितन धाकतोडे यांनी साकारली असून ठिकठाक आहे.

नाटकाचे नेपथ्यात भव्यदिव्यता असून उत्तम साकारले आहे. प्रकाशयोजना म्हणावी तशी जमली नाही. अनेक वेळा संपुर्ण रंगमंचावर प्रकाशाची आवश्यकता नसतानाही लाईटस सुरु होता.  संगीत आणखी चांगले करता आले असते. वेषभूषा अन रंगभूषा उत्तम साकारली आहे.

 याचक

याचक सार्थक बहुउद्देशीय संस्था श्रीरामपूर

लेखक : प्रल्हाद जाधव

दिग्दर्शक : संदीप कदम

पात्र

मुख्यमंत्री : दिप्तेश सातपुते

नाथा : विनोद वाघमारे

गोदी : रेखा निर्मळ

डांगे : हितन धाकतोडे

नेपथ्य : अंजली मोरे., मुनीर सय्यद

प्रकाशयोजना : सुनिता वाघ

संगीत : नवनाथ कर्डीले

वेषभूषा : गणेश ससाणे, अवधूत कुलकर्णी

रंगभूषा : ऋतुजा धुमाळ

निर्मिती प्रमुख : शकिल बागवान, उमेश तांबडे, शिरीष सुर्यवंशी

रंगमंच व्यवस्था : स्नेहमाला फांउडेशन