संगमनेरात रंगल्या अंधांच्या राजस्तरीय क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 06:07 PM2018-02-24T18:07:14+5:302018-02-24T18:07:14+5:30

अंधांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस शनिवारी येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात संकुलात सुरूवात झाली. सकाळच्या पहिल्या सत्रात धुळे व नाशिक संघाचा सामना रंगलेला पाहायला मिळाला.

The state level cricket competition in the confluence of the blind | संगमनेरात रंगल्या अंधांच्या राजस्तरीय क्रिकेट स्पर्धा

संगमनेरात रंगल्या अंधांच्या राजस्तरीय क्रिकेट स्पर्धा

googlenewsNext

संगमनेर : अंधांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस शनिवारी येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात संकुलात सुरूवात झाली. सकाळच्या पहिल्या सत्रात धुळे व नाशिक संघाचा सामना रंगलेला पाहायला मिळाला.
धुळे संघाने प्रथम फलंदाजी करत संघातील पहिल्या फळीतील फलंदाजांनी चौकार षटकारांची फटकेबाजी केली. संगमनेरात प्रथमच अंधांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेक्षकांनी सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. संगमनेर क्रिकेट संघटना व अंध कल्याणकारी संघाच्या वतीने ही स्पर्धा होत आहे. यात पुणे, अकोला, धुळे, कोल्हापूर, नाशिक, नगर, जळगाव येथील अंध क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला आहे. विजेत्या संघांना भरघोस पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जयहिंद युवा मंच, संगमनेर वकील संघ, सीए कै लास सोमाणी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुहास आहेर, संदीप लोहे, आसिफ तांबोळी, स्वप्नील खोजे, नीलेश कदम परिश्रम घेत आहेत. जयहिंद आर्गनायझेशन फॉर द ब्लार्इंड आॅफ इंडियाचे अशोक पवार व शंकर साळवे हे अंध क्रिकेट खेळाडूंसाठी विशेष कार्यरत असतात.

Web Title: The state level cricket competition in the confluence of the blind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.