...तर मित्रच येणार आमने-सामने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 04:39 PM2019-03-15T16:39:48+5:302019-03-15T16:41:04+5:30

अहमदनगर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप उमेदवार असले तरी प्रचाराची धुरा आ़ संग्राम यांच्यावरच राहणार आहे़

 So friend will come face-to-face? | ...तर मित्रच येणार आमने-सामने?

...तर मित्रच येणार आमने-सामने?

Next

अहमदनगर : अहमदनगर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप उमेदवार असले तरी प्रचाराची धुरा आ़ संग्राम यांच्यावरच राहणार आहे़ त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आ़ संग्राम विरुध्द डॉ़ सुजय विखे यांच्यातच खरी लढत होणार असल्याचे मानले जाते़ एकमेकांचे पारंपरिक राजकीय मित्र असलेले जगताप व विखे कुटुंब या निवडणुकीत प्रथमच आमने-सामने येत असल्याने चुरस वाढणार आहे़
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे १९९० मध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते़ त्यावेळी काँग्रेसच्या युवक शहराध्यक्षपदाची धुरा अरुण जगताप यांच्याकडे होती़ या दोन्ही नेत्यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढविला़ विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने आ़ जगताप यांनी त्यावेळी काँग्रेसला रामराम ठोकला़ तेव्हापासून जगताप काँग्रेसपासून दूरच राहिले़ पण, त्यांची व विखे यांची मैत्री कायम राहिली़ काही दिवसांपूर्वी झालेली महापालिका निवडणूक आ़ संग्राम जगताप व डॉ़ सुजय विखे यांनी एकत्रित लढविली़
निवडणुकीनंतर मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र राहिले नाहीत. राष्ट्रवादी भाजप सोबत गेली, तर काँग्रेस तटस्थ राहिली़
महापौर निवडणुकीत विखेंची शहर काँग्रेस अलिप्त होती़ या निवडणुकीतच विखेंनी अहमदनगर लोकसभेची पेरणी केली़ पण आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले़ विखे यांच्या भाजप प्रवेशाने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील समीकरण बदलले़ भाजपकडून खासदार दिलीप गांधी यांच्याऐवजी डॉ़ सुजय विखे यांना उमेदवारी दिजी जाण्याची शक्यता आहे़ त्यामुळे राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची करत त्यांच्याविरोधात तोडीसतोड उमेदवार देण्याची व्यूहरचना आखली आहे़ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर १९९१ ची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार केला़ते विधान परिषदेचे आ़ अरुण जगताप यांना मैदानात उतरविण्याच्या प्रयत्नात आहेत़ नगर शहरात आ़ संग्राम जगताप यांनी तरुण कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली़ परंतु, जिल्ह्यात त्यांचा तसा संपर्क नाही़
ग्रामीण भागात आ़ अरुण जगताप यांना मानणारा एक वर्ग आहे़ त्या तुलनेत डॉ़ विखे यांची नगर शहरावर पकड नाही़ शहरातील मतांसाठी त्यांना सेना- भाजपावर अवलंबून राहावे लागणार आहे़ परंतु, खा़ गांधी यांना उमेदवारी नाकारल्याने गांधी समर्थक विखे यांचा प्रचार करतील का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे़


आमदार शिवाजी कर्डिलेंच्या भूमिकेकडे लक्ष
काँग्रेसचे डॉ़ सुजय विखे यांना भाजपत आणण्यात भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भूमिका महत्वाची राहिली आहे़ या प्रवेश सोहळ्याला कर्डिले उपस्थित होते़ भाजपने विखे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीकडून कर्डिले यांचे नातेवाईक असलेले अरुण जगताप यांचे नाव पुढे आले़ जगताप यांच्या उमेदवारीवर नेत्यांनी शिक्कामोर्तब केले़ परंतु,आ़ जगताप यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा पक्षाने केलेली नाही़ राष्ट्रवादीने जगताप यांना उमेदवारी दिल्यास शिवाजीराव कर्डिले कुणाला मदत करणार जगतापांना की सुजय विखे यांना, याची चर्चा सध्या मतदारांमध्ये आहे़

Web Title:  So friend will come face-to-face?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.