श्रीगोंदा तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; तिघांना जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:51 PM2017-10-19T17:51:06+5:302017-10-19T17:53:03+5:30

Smugglers in Shrongonda taluka; Suicide Three | श्रीगोंदा तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; तिघांना जबर मारहाण

श्रीगोंदा तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; तिघांना जबर मारहाण

Next

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव शिवारातील चिचकूट वस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला करून दरेकर परिवारातील तिघांना जबर मारहाण करून जखमी केले. त्याच टोळीने कोकणगाव शिवारातील संतोष संपत शिंदे यांच्या घरावर हल्ला केला. पोलिसांची गाडी आल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोरांनी पळ काढल्यामुळे शिंदे यांची मारहाण वाचली.
मध्यरात्री हिरडगाव येथील चिचकूट वस्तीवरील हरिभाऊ भाऊसाहेब दरेकर परिवारासह हॉलमध्ये झोपलेले असता पाच दरोडेखोरांनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. शेजारच्या खोलीत उचकापाचक सुरु केल्यावर आवाजाने जागे झालेल्या हरिभाऊ आणि त्यांची पत्नी राणी यांना लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसºया खोलीत झोपलेल्या आई - वडिलांनी आरडाओरडा केल्यानंतर दरोडेखोरांनी धूम ठोकली. त्यामध्ये सात तोळे सोने आणि सहा हजार रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. दरेकर दांपत्य जबर जखमी झाले आहेत.
याच टोळीने जवळच असलेल्या कोकणगाव शिवारातील संतोष संपत शिंदे यांच्या घराकडे मोर्चा वळविला. दगडाने दरवाजावर प्रहार करत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. शिंदे यांच्या आई सुमन, पत्नी सारिका, वडील यांना मारहाण केली. असेल तेवढा ऐवज द्या अन्यथा मुलगी सानिका ( वय ११ वर्षे ) हिचा जीव घेऊ असे धमकावले. चिचकूट वस्तीवरील हल्ल्यानंतर पोलीस पथकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या शिंदे यांना सावध करण्याच्या दृष्टीने त्यांच्या घराकडे गाडी वळवली. गाडी पाहताच दरोडेखोरांनी धूम ठोकली. स्थानिकांसह पोलिसांनी पाठलाग केला पण अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पसार झाले. शिंदे यांच्या घरात झाडाझडती घेऊन दोन तोळे सोने आणि १७ हजार रोख रक्कम लंपास केली. जखमींच्या मदतीसाठी प्रशांत दरेकर, मिलिंद दरेकर, नवनाथ दरेकर, देवराम दरेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Smugglers in Shrongonda taluka; Suicide Three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.