डॉक्टरांना शिवीगाळ करणा-या संगमनेर पालिकेच्या शिवसेना नगरसेवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 5:39pm

शिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे व त्याचा मित्र प्रशांत प्रभाकर झावरे या दोघांनी गुरुवारी मध्यरात्री घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांना मद्यप्राशन करून शिवीगाळ व धक्काबुकी केल्याने त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर : शिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे व त्याचा मित्र प्रशांत प्रभाकर झावरे या दोघांनी गुरुवारी मध्यरात्री घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांना मद्यप्राशन करून शिवीगाळ व धक्काबुकी केल्याने त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. नगरसेवक घोरपडे व त्याचा मित्र झावरे हे दोघे गुरूवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या एकाला घेवून घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी रूग्णालयात उपस्थित असलेल्या कर्मचा-यांना डॉक्टर कुठे आहेत? अशी विचारणा केल्यानंतर कर्मचा-यांनी लगेचच डॉ. संदिप कचेरीया यांना याबाबत भमण्रध्वनीवरुन कल्पना दिली. डॉक्टर रूग्णालयात येण्याअगोदर काही काळ घोरपडे व झावरे यांनी तेथे उपस्थित असणा-यांना सरकारी कर्मचा-यांना शिवीगाळ व धक्काबुकी करत जीवे मारण्याची धमकी दिली. डॉ. कचेरीया हे तेथे तात्काळ उपस्थित झाले त्यानंतर त्यांनी जखमी रूग्णावर उपचार केले. घोरपडे व त्याचा मित्र झावरे या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी रूग्णालयातील कर्मचारी दादा लल्लु साबळे यांनी दिलेल्या फिर्यादवरून घोरपडे व झावरे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.  

संबंधित

शिवसेना नगरसेवक गायकवाडला अटक
लाच घेताना शिवसेना नगरसेविकेला अटक

अहमदनगर कडून आणखी

निराधार माऊलीची कॅन्सरपासून मुक्तता : डॉ. सतीष सोनवणे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
केडगाव हत्याकांडप्रकरणी विधानपरिषदेत सेना- राष्ट्रवादी आमने-सामने
पिंपळगावखांडमध्ये विद्यार्थ्यांनी केला चार तास रास्ता रोको
दूध दरवाढीसाठी अहमदनगर- पुणे महामार्गावर रास्ता रोको
राहाता तालुक्यातील प्राध्यापकाकडून फळांच्या प्रतवारीसाठी तंत्रज्ञान विकसित

आणखी वाचा