Shirdi Lok Sabha Election 2019 live result & winner: Sadashiv Kisan Lokhande VS Bhausaheb Malhari Kamble Votes & Results round 10 | शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019: दहाव्या फेरीअखेर सदाशिव लोखंडे ६६ हजार मतांनी आघाडीवर
शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019: दहाव्या फेरीअखेर सदाशिव लोखंडे ६६ हजार मतांनी आघाडीवर

शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोेखडे यांना दहाव्या फेरीअखेर ६६ हजार १७७ मतांची आघाडी मिळाली आहे़
लोखंडे यांना २ लाख ४० हजार ९६८ मते मिळाली आहेत़ तर काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना १ लाख ७४ हजार ७९१ मते मिळाली आहेत़ अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांना १८ हजार ४७१ मते मिळाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखधान यांना ५० हजार ७३३ मते मिळाली आहेत.
शिवसेना हा गड कायम राखील, या दृष्टीने लोखंडे यांना आघाडी मिळताना दिसत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.५४ टक्के मतदान झालंय.
गेल्या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना ५ लाख ३२ हजार ५७७ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना ३ लाख ३२ हजार ७१२ मतं मिळाली होती.


Web Title: Shirdi Lok Sabha Election 2019 live result & winner: Sadashiv Kisan Lokhande VS Bhausaheb Malhari Kamble Votes & Results round 10
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.