भुजबळांविषयी अपशद्व वापरल्याने श्रीगोंद्याचा फौजदार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 05:36 PM2018-07-18T17:36:52+5:302018-07-18T17:37:06+5:30

कोसेगव्हाण येथे एका आरोपीस पकडण्यासाठी गेले असता श्रीगोंद्या पोलीस ठाण्याचे फौजदार महावीर जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणाचे बुधवारी विधानसभेत पडसाद उमटले. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाधव यांच्या निलंबनाची घोषणा केली.

 Sharda's army suspended due to the use of power of Bhujbal | भुजबळांविषयी अपशद्व वापरल्याने श्रीगोंद्याचा फौजदार निलंबित

भुजबळांविषयी अपशद्व वापरल्याने श्रीगोंद्याचा फौजदार निलंबित

Next

श्रीगोंदा : कोसेगव्हाण येथे एका आरोपीस पकडण्यासाठी गेले असता श्रीगोंद्या पोलीस ठाण्याचे फौजदार महावीर जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणाचे बुधवारी विधानसभेत पडसाद उमटले. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाधव यांच्या निलंबनाची घोषणा केली.
राष्ट्रवादीचे श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप व मुंबईचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतचा विषय विधिमंडळाच्या नागपूरमधील पावसाळी अधिवेनात विधानसभेत उपस्थित केला होता. आ. जगताप म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्याविषयी कारण नसताना श्रीगोंद्याचे फौजदार महावीर जाधव यांनी कोसेगव्हाण येथे माजी सरपंच भीमराव नलगे यांच्या वस्तीवर काही संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. तेव्हा जाधव या जबाबदार अधिकाऱ्याने भुजबळ यांच्याविषयी अपशब्द वापरले. यासंदर्भात सोशल मीडियावर क्लिप व्हायरल झाली होती. तसेच याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आंदोलनेही झाली. त्यानंतर या अधिकाºयावर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही, याकडे आ. जगताप यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा आक्रमकपणा पाहून विधानसभा अध्यक्ष बागडे फौजदार महावीर जाधव यांना सेवेतून निलंबित करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी बाके वाजवून समाधान व्यक्त केले.

 

Web Title:  Sharda's army suspended due to the use of power of Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.