संस्थेतील वादातून शाळेची चोरी

By admin | Published: January 27, 2015 12:18 PM2015-01-27T12:18:17+5:302015-01-27T12:18:17+5:30

संस्था चालक आणि संचालक यांच्यातील वादातून घुमरी (ता. कर्जत) येथील आठवी ते दहावी ही माध्यमिक शाळा चक्क चोरीस गेल्याची घटना नोव्हेंबर २0१४ ला घडली.

School theft from school debate | संस्थेतील वादातून शाळेची चोरी

संस्थेतील वादातून शाळेची चोरी

Next

 ज्ञानेश दुधाडे■ अहमदनगर

संस्था चालक आणि संचालक यांच्यातील वादातून घुमरी (ता. कर्जत) येथील आठवी ते दहावी ही माध्यमिक शाळा चक्क चोरीस गेल्याची घटना नोव्हेंबर २0१४ ला घडली. याबाबत संस्था चालक परशुराम अनभुले यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कर्जत पोलिसांनी जिल्हा परिषदेकडे मागवलेल्या माहितीत संबंधित शाळेची इमारत वगळता विद्यार्थी, शाळेचे दप्तर, साहित्य, विद्यार्थ्यांचे बसण्याचे बाक यांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. यासाठी कोणाचीच परवानगी घेण्यात आलेली नाही. 
कर्जत तालुक्यातील घुमरी येथे परशुराम अनभुले यांनी त्यांच्या शेतातील एक एकर जागा गुरूदत्त विद्यालयास ९९ वर्षाच्या कराराने दिली. या शाळेचे ते अध्यक्ष आहेत. मात्र, शाळेच्या संचालक मंडळ आणि अनभुले यांच्यात कायदेशीर वाद निर्माण झाले. याबाबत सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात वाद सुरू असतांना ६ नोव्हेंबर २0१४ ला शाळेतील चार ते पाच कर्मचारी आणि गावातील तिघा संचालकांनी शाळेतील इमारत वगळता साहित्य, शाळेचे दप्तर, विद्यार्थ्यांना बसण्याचे बाक आणि विद्यार्थी चोरल्याची तक्रार शाळेचे अध्यक्ष अनभुले यांनी कर्जत पोलीस ठाण्यात केली आहे. 
सध्या ही शाळा घुमरी गावात मंदिरात, ग्रामपंचायतीच्या जागेत अपुर्‍या सुविधेत भरवण्यात येत आहे. या शाळेला २0१२-१३ मध्ये आरटीईचे निकष पूर्ण केल्याने शिक्षणाधिकारी यांनी मान्यता दिली होती. शाळा चोरीला गेल्याची माहिती अनभुले यांनी पोलिसात दिल्यानंतर कर्जत पोलिसांनी जिल्हा परिषदेकडे माहिती मागविली. शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी कर्जत येथील विस्तार अधिकारी यांच्या मार्फत केलेल्या चौकशीत ही शाळा ग्रामपंचायतींच्या अपुर्‍या जागेत भरविण्यात येत आहे. शाळेचे स्थलांतर होण्यापूर्वीची इमारत मान्यता प्राप्त आहे. अनधिकृत शाळेत झेंडावंदन होणार ?
■ ७ नोव्हेंबर २0१४ पासून ही शाळा अनधिकृत जागेत भरविण्यात येत आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही त्याची चौकशी झालेली नाही. 
■ शाळेत सध्या तीन शिक्षक कार्यरत असून एक शिक्षक सेवेत बडतर्फ झालेला आहे. आणि एक शिक्षक शाळेचे स्थलांतर झाल्यापासून रजेवर आहे. याच अनधिकृत शाळेत २६ जानेवारीला झेंडावंदन होणार आहे.

■ शाळेचे स्थलांतरही अनधिकृत असून त्यासाठी परवानगी आवश्यक असतांना ती घेण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे. विस्तार अधिकारी यांनी आपला अहवाल जिल्हा परिषदेला पाठविला असून शिक्षणधिकारी कडूस यांनी त्यांचा अहवाल कर्जत पोलिसांना दिलेला आहे. आता पोलीस या प्रकरणी काय करवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

■ सीना ग्रामीण विकास संस्था घुमरी संस्थेंतर्गत चालविण्यात येणार्‍या गुरूदत्त विद्यालयाचा मी अध्यक्ष आहे. संस्थेतील काही संचालका विरोधात धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार होवून सुनावणी सुरू आहे. मात्र, मी अध्यक्ष असताना शाळेच्या अधिकृत जागा आणि इमारतीतून साहित्य, दप्तर, बाके आणि विद्यार्थ्यांची चोरी झाली आहे. कर्जत पोलिसांनी त्याचा शोध घेवून न्याय मिळवून द्यावा.
-परशुराम अनभुले, अध्यक्ष, सीना ग्रामीण विकास संस्था,

Web Title: School theft from school debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.