Savawakoti's debt waiver for two hundred farmers of Ralegan Siddhi | राळेगणसिद्धीमधील दोनशे शेतक-यांना सव्वाकोटींची कर्जमाफी

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत

राळेगणसिद्धी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राळेगणसिद्धी व परिसरातील १० गावांतील २०० शेतकºयांना जवळपास सव्वा कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने पहिल्या टप्प्यातील यादी बँकाकडे देऊन रक्कम उपलब्ध करून दिली आहे. बँक आॅफ महाराष्ट्रच्या राळेगणसिद्धी शाखेत आतापर्यंत २०० शेतक-यांची कर्र्जमाफी झालेली यादी प्राप्त झाली आहे. ही रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे शाखाधिकारी ए. बी. चोथमल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, शासनाकडून २०० शेतक-यांची यादी व जवळपास सव्वा कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. सध्या ही रक्कम कर्जदार शेतक-यांच्या नावावर जमा करण्यात येत असल्याचे बँक आॅफ महाराष्ट्रचे सहाय्यक व्यवस्थापक राहुल बांगर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.