सराफ आत्महत्या : पोलिसांवर गुन्हे दाखल करा, शिर्डीच्या सराफ संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:33 PM2018-08-18T17:33:17+5:302018-08-18T17:33:38+5:30

श्रीरामपूर येथील सराफ गोरख मुंडलिक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिर्डीच्या सराफ संघटनेने केली आहे.

Saraf Suicide: Investigate crimes against the police, demand Shardi's Saraf Sangh | सराफ आत्महत्या : पोलिसांवर गुन्हे दाखल करा, शिर्डीच्या सराफ संघटनेची मागणी

सराफ आत्महत्या : पोलिसांवर गुन्हे दाखल करा, शिर्डीच्या सराफ संघटनेची मागणी

Next

शिर्डी : श्रीरामपूर येथील सराफ गोरख मुंडलिक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिर्डीच्या सराफ संघटनेने केली आहे.
चोरीच्या सोन्याविषयी चौकशी दरम्यान संगमनेरच्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी त्रास देऊन मुंडलिक यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले. मुंडलिक यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असता संबंधित पोलिसांनी त्यांना वैद्यकीय मदत देण्याची माणुसकीही दाखविली नाही. त्यामुळे मुंडलिक यांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन करावे, अशा मागणीचे निवेदन शिर्डीच्या सराफ व्यावसायिकांनी शनिवारी प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी सचिन नागरे, योगेश नागरे, बाळासाहेब नागरे, शांताराम नागरे, मुकूंद मयुर, बाळासाहेब दहिवाळ, मंगेश नागरे, प्रशांत शहाणे, सुनील नागरे, सागर नागरे, दीपक दंडगव्हाळ, गजानन जंगम, वाल्मिक उदावंत, अवधुत माळवे, राजेंद्र नागरे, सागर मुंडलिक आदी उपस्थित होते.

 

Web Title: Saraf Suicide: Investigate crimes against the police, demand Shardi's Saraf Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.