केडगाव दुहेरी हत्याकांड : माजी महापौर संदीप कोतकरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 09:51 AM2019-01-15T09:51:45+5:302019-01-15T09:58:31+5:30

खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप कोतकर याला सीआयडीने केडगाव हत्याकांडाच्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले असून त्याला अटक केली आहे.

Sandeep Kotkar arrested in Ahmednagar for double murder of Shiv Sena leaders | केडगाव दुहेरी हत्याकांड : माजी महापौर संदीप कोतकरला अटक

केडगाव दुहेरी हत्याकांड : माजी महापौर संदीप कोतकरला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देखुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप कोतकरला अटक केली आहे.कोतकरला आज दुपारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संदीप कोतकर संदर्भात राज्य सरकारने सीआयडीला केडगाव हत्याकांडात वर्ग करून घेण्याची परवानगी दिली होती.

अहमदनगर: खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप कोतकर याला सीआयडीने केडगाव हत्याकांडाच्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले असून त्याला अटक केली आहे. कोतकर याला आज दुपारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

एखाद्या गुन्ह्यात आधी शिक्षा झालेल्या आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी लागते. संदीप कोतकर संदर्भात राज्य सरकारने सीआयडीला केडगाव हत्याकांडात वर्ग करून घेण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार सीआयडीने सोमवारी दुपारी नाशिक कारागृहात जाऊन कोतकरला वर्ग करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत रात्री त्याला नगर येथे आणले. केडगाव येथे सात एप्रिल रोजी शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत ठुबे व संजय कोतकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या हत्याकांडात आरोपी म्हणून संदीप कोतकर यांच्या नावाचा समावेश आहे.

Web Title: Sandeep Kotkar arrested in Ahmednagar for double murder of Shiv Sena leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.