उसाला ३४०० रुपये दर मिळण्यासाठी राहुरीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 5:55pm

यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३४०० रूपये भाव देण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राहुरी तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राहुरी : यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३४०० रूपये भाव देण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राहुरी तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी संघटनेच्या वतीने निवासी तहसीलदार गणेश तळेकर व पोलीस उपनिरिक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले. साखर कारखाने सुरू झाले असून साखर कारखान्यांनी सर्वाधिक भाव देऊ असे सांगून शेतक-यांची दिशाभूल केली आहे़शेतकºयांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता साखर कारखान्यांनी भाव जाहीर करावा अन्यथा कारखाने बद पाडू, असा इशारा राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिला. प्रकाश देठे म्हणाले, ऊस उत्पादनावरील खर्च वाढला असून कमीतकमी भावात ऊस लाटण्याचा कारखानदारीचा उद्योग आहे. शासन व कारखानदाराने बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन छेडून जाब विचारला जाईल, असा इशारा देठे यांनी दिला. यावेळी देवेंद्र लांबे, संदीप खुरूद, ज्ञानेश्वर क्षिरसागर, दिनेश वराळे, अरूण डौले, सुनिल इंगळे यांची भाषणे झाली. आंदोलनात सतीश पवार, सचिन म्हसे, भाऊसाहेब गटकळ, विजय तोडमले, संदीप शिरसाट, विजय तोडमल, काका राजदेव, किशोर वराळे आदी उपस्थित होते.

संबंधित

काटापेमेंट तोडी जोमात, सभासदांच्या उसाला तुरे!
उसाला एफआरपी दर देणार
उसाला 3500 रुपये पहिली उचल द्या

अहमदनगर कडून आणखी

वाळू ठेका चालविण्यासाठी मनसेच्या पदाधिका-याने मागितली खंडणी
वाळू ठेक्यांच्या निविदेतच घोटाळा
अहमदनगर शहर बस सेवेची नव्याने निविदा प्रसिध्द करण्याची महापालिकेवर नामुष्की
नगर तालुक्यात ४९ गावांची जलयुक्तसाठी निवड
महापालिकेच्या कचरा वाहनावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद

आणखी वाचा