शेतीच्या वादातून भावाच्या घरावर दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:39 AM2019-01-17T10:39:04+5:302019-01-17T10:39:41+5:30

शिर्डी : शेतीच्या वादातून सख्या भावानेच आपल्या भावाच्या घरावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना येथून जवळच असलेल्या बहादराबाद येथे घडली ...

Ridiculing the brother's house from the dispute of farming | शेतीच्या वादातून भावाच्या घरावर दरोडा

शेतीच्या वादातून भावाच्या घरावर दरोडा

googlenewsNext

शिर्डी : शेतीच्या वादातून सख्या भावानेच आपल्या भावाच्या घरावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना येथून जवळच असलेल्या बहादराबाद येथे घडली आहे़ मुख्य आरोपी असलेल्या सख्या भावासह पाच जणांना पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे़
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, सुनील मारुती पाचोरे व बाळासाहेब पाचारे हे दोघे सख्खे भाऊ आहेत़ त्यांच्यात शेतीच्या वादातून वितुष्ट आले होते़ यातून बाळासाहेब याने भावाला धडा शिकवण्याच्या उद्देशाने सुनील पाचारे यांच्या घरावर भाडोत्री दरोडेखोरांच्या मदतीने दरोडा टाकल्याचे उघडकीस आले. २१ नोव्हेंबर २०१८ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास पोहेगाव शिवारात बहादराबाद येथील सुनील मारुती पाचोरे हे कुटुंबासह घरात झोपले असताना त्यांच्या घरावर दरोडा पडला होता़ रोडवर अपघात झाल्याचे सांगत पाणी मागण्याच्या बहाण्याने दरवाजा उघडण्यास भाग पाडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला होता़ यावेळी त्यांनी घरातील लोकांना दमदाटी शिवीगाळ मारहाण करून ९५ हजार ५०० रुपये व सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता़ यासाठी प्रत्येक आरोपीला साडे आठ हजार रूपये दिले होते़
याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल होता़ घटनेचा तपास करीत असताना राहता येथील आकाश बाळासाहेब गायकवाड याने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
यावरून पोलिसांनी बाळासाहेब मारुती पाचोरे (वय ३५, रा.बहादराबाद, ता.कोपरगाव) यांच्यासह आकाश बाळासाहेब गायकवाड (वय २१, रा. आंबेडकरनगर, राहाता), योगेश कोंडीराम खंडीझोड (वय २१, रा. वेस तालुका, कोपरगाव), प्रवीण रामनाथ खंडीझोड (वय २१), रा.सोयगाव (ता.कोपरगाव), अक्षय अशोक पारधे (वय १९, रा. पारधे वस्ती, अस्तगाव रोड, राहाता) या आरोपींना अटक केली आहे़ याशिवाय वीरेश सुरेश कोपरे (रा.राहाता) हा अद्याप फरार आहे़

Web Title: Ridiculing the brother's house from the dispute of farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.