राहुरीत प्राध्यापकास पट्ट्याने जबर मारहाण : दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 10:58 AM2018-11-30T10:58:09+5:302018-11-30T11:46:14+5:30

सलूनच्या दुकानात सुरू असलेल्या गाण्याचा आवाज कमी करण्याचे सांगितल्याचा राग आल्याने सलून दुकानातील दोघाजणांनी प्राध्यापकाचा डोळा फोडला.

Relief professor stabbed to death: Both arrested | राहुरीत प्राध्यापकास पट्ट्याने जबर मारहाण : दोघांना अटक

राहुरीत प्राध्यापकास पट्ट्याने जबर मारहाण : दोघांना अटक

googlenewsNext

राहुरी : सलूनच्या दुकानात सुरू असलेल्या गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितल्याचा राग आल्याने सलून दुकानातील दोघाजणांनी प्राध्यापकाचा डोळा फोडला. ही घटना राहुरी शहरात शुक्रवार(२३ नोव्हेंबर) रोजी घडली. याबाबत बुधवारी(२८ नोव्हेंबर) रोजी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राध्यापक दीपक सुभाष निर्मळ यांना मारहाण करणा-या अमोल बाळासाहेब कदम व मयुर दत्तात्रय कदम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान राहुरी येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक असलेले दीपक सुभाष निर्मळ हे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर हॉटेल अमर शेजारी क्लास घेत होते. तेव्हा त्यांच्या क्लासच्या खाली असलेल्या सलूनच्या दुकानात टेपवर मोठ्या आवाजात गाणी सुरू होते. प्राध्यापक निर्मळ यांनी आवाज कमी करण्यास सांगितले. याचा राग आल्याने सलून दुकानातील अमोल कदम व मयुर कदम या दोघांनी निर्मळ यांना मारहाण केली. या मारहाणीत निर्मळ यांच्या डोळ्याला जबर मार लागला.
निर्मळ यांच्या फिर्यादीवरून अमोल कदम व मयुर कदम यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव करत आहेत.

Web Title: Relief professor stabbed to death: Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.