वाळू ठेका चालविण्यासाठी मनसेच्या पदाधिका-याने मागितली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:45 PM2018-04-20T13:45:10+5:302018-04-20T13:45:10+5:30

वाळू ठेका चालविण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागणा-या मनसे पदाधिका-याने तब्बल दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात या पदाधिका-यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The Ransom Requested by the MNS Executive to run the sand contract | वाळू ठेका चालविण्यासाठी मनसेच्या पदाधिका-याने मागितली खंडणी

वाळू ठेका चालविण्यासाठी मनसेच्या पदाधिका-याने मागितली खंडणी

Next

अहमदनगर : वाळू ठेका चालविण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागणा-या मनसे पदाधिका-याने तब्बल दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात या पदाधिका-यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मनसे शहर जिल्हाध्यक्ष गजानन राशीनकर व बापू बाचकर अशी त्यांची नावे असून कोतवाली पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुरुवारी रात्री उशिरा ठेकेदार नंदरुमार गागरे (रा. देसवंडी. ता. राहुरी) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार (दि. १८ एप्रिल) रोजी ही खंडणी मागून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे या फिर्यादित म्हटले आहे.

Web Title: The Ransom Requested by the MNS Executive to run the sand contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.