जिल्ह्यात पाऊस नॉट आॅऊट ९१ टक्के 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:45 PM2017-08-24T13:45:16+5:302017-08-24T13:58:28+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात काल दिवसअखेर तब्बल ९१ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल २३ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे हे प्रमाण वाढले आहे.

Rainfall in the district is 91% | जिल्ह्यात पाऊस नॉट आॅऊट ९१ टक्के 

जिल्ह्यात पाऊस नॉट आॅऊट ९१ टक्के 

Next
ठळक मुद्देसर्वाधिक १४३ टक्के अकोलेत सर्वात कमी ६७ टक्के कोपरगाव तालुक्यात

अहमदनगर : जिल्ह्यात काल दिवसअखेर तब्बल ९१ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल २३ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे हे प्रमाण वाढले आहे. अद्याप परतीचा मान्सून हजेरी लावणार असल्याने यंदा जिल्ह्यात १०० टक्केपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शकयता वर्तविली जात आहे. 
जिल्ह्यातील सर्वच चौदा तालुक्यांत दमदार पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १४३ टकके पावसाची नोंद अकोले तालुक्यात झाली आहे. मात्र हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. अद्यापर्यत अकोले तालुक्यात ७०७ मिमी पाऊस झाला आहे. त्याखालोखाल १२० टक्के  पाऊस राहाता तालुक्यात झाला आहे. आतापर्यत ५३१ मिलीमीटर पावसाची नोंद राहाता तालुक्यात झाली आहे. त्यानंतर नेवासा व कर्जत तालुक्यात पाऊस झाला आहे. या दोन्ही तालुक्यात १०२ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल पारनेर तालुक्यात ९३ टक्के पावसांची नोंद झाली आहे. गेल्या वर्र्षी पारनेरमध्ये कालपर्यत अवघा १८ टक्के पाऊस झाला होता. सर्र्वात कमी पाऊस कोपरगाव तालुक्यात झाला आहे. कोपरगावमध्ये ६७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यत सरासरी ४५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण ९१.३२ टक्के आहे. 

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी 
अकोले - १४३.२३
राहाता - १२०.६३
नेवासा - १०२.७७
पारनेर १०२.६५

श्रीरामपूर - ८९.८१
राहुरी - ८९.५१
शेवगाव - ८४.४२
जामखेड - ८१.३९

श्रीगोंदा - ८१.३६
नगर - ८१.२५
पाथर्डी - ७१.१७
संगमनेर - ७०.३३
कोपरगाव - ६७.९२
एकूण - ९१.३२

Web Title: Rainfall in the district is 91%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.