रेल्वे क्रॉसिंग धोकादायकच!

By admin | Published: July 27, 2014 11:26 PM2014-07-27T23:26:00+5:302014-07-28T00:52:12+5:30

अहमदनगर: दोन दिवसांपूर्वीच तेलंगणच्या मेडक जिल्ह्यात रेल्वे फाटकावर पॅसेंजरने स्कू ल बसला दिलेल्या धडकेत २५ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले.

Railway crossing dangerous! | रेल्वे क्रॉसिंग धोकादायकच!

रेल्वे क्रॉसिंग धोकादायकच!

Next

अहमदनगर: दोन दिवसांपूर्वीच तेलंगणच्या मेडक जिल्ह्यात रेल्वे फाटकावर पॅसेंजरने स्कू ल बसला दिलेल्या धडकेत २५ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले. नगर जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील अनेक मुलांना शहरातील नामवंत शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कू ल बस रेल्वे पटरी ओलांडून नेहमीच ये-जा करतात. रेल्वेफाटक सुस्थितीत असले तरीही तेथे कधी दुर्घटना घडेल याचा नेमच नाही. काय आहे या रेल्वे फाटकाची स्थिती याची पाहणी टीम ‘लोकमत’ने केली आहे. त्यात रेल्वे क्रॉसिंग धोकादायक असल्याचं वास्तव समोर आलं. रेल्वे फाटकांची स्थिती समोर मांडणारा हा वृत्तांत....!
अहमदनगर : नगर-मनमाड लोहमार्गाच्या लगत असणारे देहरे येथील रेल्वे क्रॉसिंग शॉर्टकट नव्हे तर साक्षात मृत्युचाच शॉर्टकट ठरत आहे. या शॉर्टकट व बेपर्वा क्रॉसिंगमुळे दहा ते बारा जणांचा आतापर्यंत बळी घेतला. जखमी झालेल्यांची तर गणनाच नाही. जीव मुठीत या गावात रोज हजारो पावले रेल्वेचे सर्रास पायवाटासारखा क्रॉसिंग करून मृत्यूला आमंत्रण देत आहे.
देहरे (ता.नगर) या गावातूनच हा लोहमार्ग गेल्याने अर्धे गाव इकडे तर अर्धे गाव लोहमार्गाच्या पलीकडे गेले. रोजच गावातील लोकांची इकडून तिकडे ये-जा चालू असते. ती आधी पायी, सायकलवर तर कधी दुचाकीवरून सर्रासपणे एखादी पायवाट ओलांडावी तशी रेल्वे क्रॉसिंग ओलांडणे सुरू आहे. पूर्वी या ठिकाणी रेल्वे गेट होते. मात्र हा रस्ता मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे रेल्वे गेट बंद झाले तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होत होता. याला पर्याय म्हणून उड्डाण पूल बांधला. यामुळे वाहतूक सुरळीत झाली. रेल्वेगेट काढण्यात आले. मात्र नागरिकांना या रेल्वेक्रॉसिंग वरूनच जाण्याची वेळ आली. यामुळे आतापर्यंत १०-१२ जणांचा जीव ही गेला. गावाच्या एका भागात सर्व शासकीय कार्यालय, बाजारपेठ, विद्यालय असल्यामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना या रेल्वेक्रॉसींगवरून शॉर्टकटचा मार्ग धरावा लागत आहे. याचा मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनही केले. याला पर्याय म्हणून भुयारी मार्ग ही काढण्यात आला. भुयारी मार्ग तयार होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण झाले. या भुयारी मार्गात पुन्हा नगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मध्येच आडवी आली. यामुळे भुयारी मार्ग होऊनही त्याचा फायदा अजुनही ग्रामस्थांना झाला नाही. याकामी मार्गाला कधी मुहूर्त मिळतो याकडे प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
उड्डाणपुलाची गरज
कोपरगाव रेल्वे स्टेशन अंतर्गत पाच रेल्वे क्रॉसिंग गेट आहेत़ या सर्व ठिकाणी भक्कम गेट, गेटमन असला तरी नागरिकांनाच वेळ नसल्याने आपला जीव धोक्यात घालून गेट खालून निघण्याचा प्रयत्न केला जातो़ गेट बंद झाल्याने होणारी गर्दी पाहता शिंगणापूर व पुणतांबा येथील गेटवर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग काढण्यात येणे अत्यंत आवश्यक आहे़ कोपरगाव रेल्वे स्टेशन अंतर्गत अंचलगाव, शिंगणापूर, कान्हेगाव, संवत्सर, कोपरगाव ते येवला अशी पाच रेल्वे क्राँसिंग गेट आहेत़ येथील यंत्रणा अद्ययावत आहेत. गाडी येणार असल्यास फाटक लावले जाते़ त्यानंतर स्लॉटचा लाईट लागतो़ ही यंत्रणा स्टेशन मास्तरसमोर असलेल्या कंम्प्युटर पॅनलवर आॅपरेट केली जाते़ गाडी निघून गेल्यानंतर स्टेशन मास्तर स्लॉटचा इशारा देतो़ गेटमन समोर असलेल्या यंत्रणेत स्लॉट लाईट लागतो़ त्यानंतरच गेट उघडले जाते़ ही यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने चांगली असली तरी गेटवरून जाणाऱ्या येणाऱ्यांनाच जीवापेक्षा जास्त वेळेची किंमत झाली आहे़ त्यावरून गेटमनशी भांडणे केली जातात़ फाटकातून दुचाकी वाहने काढणे, सायकलस्वार, विशेषत: शाळकरी मुले-मुली गेटखाली वाकून सायकल काढतात़ शिंगणापूर गेट आणि पुणतांबा गेटवर ही दृष्ये सर्रास पहावयास मिळतात़
1नगर-मनमाड महामार्गावर असणाऱ्या देहरे गावात जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर रेल्वे गेटच नाही. नागरिकांसह अबाल-वृद्ध असुरक्षितपणे रेल्वे ट्रॅक ओलांडतात.
2राहुरी तालुक्यात धामोरी, वांबोरी स्टेशन, सडे चौकी, राहुरी स्टेशन याठिकाणी रेल्वे चौक्या अथवा गेट आहे. मात्र, नागरिक कशाचीच तमा न बाळगता सर्रास गेटखालून दुचाकी वाहने घेऊन जातात.
3कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहे. त्याठिकाणी उड्डाण पूल अथवा भुयारी मार्ग आवश्यक आहे.

संकलन : सचिन धर्मापुरीकर,
भाऊसाहेब येवले, नागेश सोनवणे

Web Title: Railway crossing dangerous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.