राहुरी तालुका वार्तापत्र : हुमणीचा कारखान्यांच्या ‘टार्गेट क्रशींग’ला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:12 AM2018-11-17T11:12:37+5:302018-11-17T11:12:40+5:30

मुळा-प्रवरा नद्यांच्या कुशीत असलेल्या राहुरी तालुक्यात यंदा मुबलक ऊस उभा असताना साखर कारखान्यांना हुमणीने जबर धक्का दिला आहे.

Rahuri taluka news paper: Breaks to the 'working crushing' of the workers of Humani factories | राहुरी तालुका वार्तापत्र : हुमणीचा कारखान्यांच्या ‘टार्गेट क्रशींग’ला ब्रेक

राहुरी तालुका वार्तापत्र : हुमणीचा कारखान्यांच्या ‘टार्गेट क्रशींग’ला ब्रेक

Next

भाऊसाहेब येवले
मुळा-प्रवरा नद्यांच्या कुशीत असलेल्या राहुरी तालुक्यात यंदा मुबलक ऊस उभा असताना साखर कारखान्यांना हुमणीने जबर धक्का दिला आहे. त्यापेक्षाही जास्त जबर धक्का शेतकऱ्यांना बसला आहे. सहकारी सोसायट्या व बाजारपेठेला सावरणे अवघड बनले आहे़ राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे व वांबोरी येथील प्रसाद शुगर यांनी यंदा विस्तारीकरण करून उसाचे मोठ्या प्रमाणावर गळीत करण्याचे टार्गेट टोळ्यांसमोर ठेवले होते. मात्र ५० टक्के टार्गेट पूर्ण करणे देखील कारखान्यांना अवघड होणार आहे. बाहेरील कारखाने राहुरीचा ऊस नेण्यासाठी सज्ज असल्याने स्थानिक कारखाने कात्रीत सापडले आहेत.
वांबोरी येथील प्रसाद शुगरने दैनंदिन गाळप क्षमता २ हजार ५०० टनावरून ४ हजार टन केली होती. यंदाच्या गळीत हंगामात आठ लाख टन उसाचे गाळप करण्याची घोषणा केली होती. कारखान्याकडे नऊ लाख टन उसाची नोंद झाल्याचा दावाही करण्यात आला होता. याशिवाय बाहेरूनही ऊस आणण्याची तयारी केली होती. यंत्र सामग्रीचे आधुनिकीकरणाबरोबरच पुरेशा प्रमाणावर ऊस तोडणी कामगारांची जमवाजमवही केली होती. मात्र हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने टार्गेट पूर्ण करण्याला बे्रक बसणार आहे.
डॉ. बा. बा. तनपुरे कारखान्याचे बॉयलर बदलून ओव्हर आॅइलिंग व्यवस्थित केल्याने सहा लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सर्वसामान्य शेतकरी राहुरीलाच ऊस देतो, असा इतिहास आहे. मात्र यंदा एकर-दोन एकरवाला ऊस उत्पादक अडचणीत आला आहे. त्यामुळे राहुरी कारखान्यापुढे ऊसाचे शॉर्टेज हेच मोठे आव्हान आहे. यंदा पाच लाख टन ऊस गाळप करण्याचा कारखान्याचा मानस आहे.
उसाचे उत्पादन घटल्याने तनपुरे कारखानाही टार्गेट पूर्ण करण्यास असमर्थ ठरणार आहे. यंदा कपाशीचे उत्पादन घटल्याने बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट आहे.  हुमणीमुळे सहकारी सोसायट्यांचे कंबरडे मोडणार आहे. मुळा धरणाचे पाणी आटल्याने शेतीला बे्रक बसला आहे. व्यापारावर मंदीचे सावट असल्याने सर्व क्षेत्रात सन्नाटा आहे.

प्रसाद व राहुरी कारखान्याला मिळून १४ लाख टन उसाची भूक आहे. प्रत्यक्षात ९ लाख टन उपलब्ध आहे. याशिवाय बाहेरील आठ कारखाने राहुरीचा ऊस वाहून नेत आहेत. अशा परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाल्याने मौन व्रत धारण करून आहेत. दुस-या बाजूला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करण्याच्या मनस्थितीत नाहीत.
 

Web Title: Rahuri taluka news paper: Breaks to the 'working crushing' of the workers of Humani factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.