मुळा धरण ओव्हर-फ्लो; पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 09:04 PM2017-09-21T21:04:34+5:302017-09-21T21:08:26+5:30

Radish dam over-flow; Leave the water | मुळा धरण ओव्हर-फ्लो; पाणी सोडले

मुळा धरण ओव्हर-फ्लो; पाणी सोडले

googlenewsNext

राहुरी : मुळा धरणाच्या चार व आठ क्रमांकांच्या मोºयांमधून गुरुवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता पाणी सोडण्यात आले.
आमदार शिवाजी क र्डिले व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी कळ दाबल्यानंतर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. मुळा धरणावर विधिवत जलपूजन झाल्यानंतर नदी पात्रात पाणी सोडण्यात आले़ २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात रात्री २५ हजार ३०० द.ल.घ.फू. पाणीसाठ्याची नोंद झाली. धरणाकडे ३ हजार २१३ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू होती़ पाणलोट क्षेत्रावर रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण होते़ हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरीने हजेरी लावली़
मुळा धरणावर असलेला भोंगा वाजविल्यानंतर नदी पात्रात पाणी सोडण्यात आले़ यावेळी तहसीलदार अनिल दौंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष पाटील, शिवाजीराव सोनवणे, पंढरीनाथ पवार, विजय डौले, विजय बनकर, अण्णासाहेब शेटे, सत्यवान पवार, दत्तात्रय ढुस, नामदेव ढोकणे, शामराव बुधवंत, सायली पाटील, पी़पी़तनपुरे, सतीश जाधव आदी उपस्थित होते़

Web Title: Radish dam over-flow; Leave the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.