पुणे - नाशिक महामार्गावर कार जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:10 PM2018-07-01T13:10:33+5:302018-07-01T13:10:48+5:30

पुणे- नाशिक महामार्गावर डोळासणे शिवारात मोटार कार शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे जळून खाक झाली. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

Pune - The car burns on Nashik highway | पुणे - नाशिक महामार्गावर कार जळून खाक

पुणे - नाशिक महामार्गावर कार जळून खाक

googlenewsNext

घारगाव : पुणे- नाशिक महामार्गावर डोळासणे शिवारात मोटार कार शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे जळून खाक झाली. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथून पुण्याकडे मर्सिडीज बेंझ कंपनीच्या कारमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव वारीस खान, त्यांचे स्वीय सहायक व चालक प्रवास करत होते. दरम्यान डोळासणे शिवारात ही कार आली असता अचानक कारमध्ये असणा-या वायरचे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. कार चालकाने कार थांबवल्यामुळे तिघेजण तातडीने बाहेर पडले. लागलेली आग पसरल्याने कार पूर्णपणे जळाली. दरम्यान महामार्ग पोलिसही तातडीने घटनास्थळी आले.अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी येईपर्यंत कार जळून खाक झाली.

 

Web Title: Pune - The car burns on Nashik highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.