"पाचपुते यांचे राजकारण बाजीराव मस्तानी चित्रपटासारखे"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 09:27 PM2019-01-17T21:27:25+5:302019-01-17T21:27:33+5:30

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक प्रचार रणधुमाळीत आमदार राहुल जगताप यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे राजकारण बाजीराव मस्तानी चित्रपटासारखे आहे, असा आरोप केला आहे.

"The politics of Pachapute like Bajirao Mastani film" | "पाचपुते यांचे राजकारण बाजीराव मस्तानी चित्रपटासारखे"

"पाचपुते यांचे राजकारण बाजीराव मस्तानी चित्रपटासारखे"

Next

श्रीगोंदा ( जि. अहमदनगर) : श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक प्रचार रणधुमाळीत आमदार राहुल जगताप यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे राजकारण बाजीराव मस्तानी चित्रपटासारखे आहे, असा आरोप केला आहे. या आरोपाबाबत भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लेखी पत्र पाठवून आपल्या आमदारांना आवर घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान तिसरी आघाडी मैदानात असल्याने श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. सेनेच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत आहे.
 
शिंदे यांनी खा. पत्रात म्हटले आहे, श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मला उमेदवारी दिली आहे. प्रचारात आ. जगताप यांनी वरील विधान करून महिला वर्गाचा अपमान केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महिलांचे सक्षमीकरण,सबलीकरण व महिलांचा मान सन्मान वाढविण्यासाठी सकारात्मक भूमिका मांडली आहे. अशा स्थितीत आ. जगताप यांनी केलेले विधान नक्कीच शरद पवार यांना खटकणारे आहे. तुम्ही आपल्या आमदाराला या विधानावर समज देण्याची गरज आहे. 
---
माघारीसाठी ३५ लाखांची ऑफर
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या उमेदवार सिराजबी कुरेशी यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेण्यासाठी ३५ लाख रूपयांची ऑफर आली होती. परंतु संभाजी ब्रिगेडने कुरेशी यांची उमेदवारी कायम ठेऊन जातीय राजकारणाची समीकरणे मोडून काढली आहेत, असा दावा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी केला आहे. 
 सेनेच्या उमेदवारांची माघार
 श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत सेनेने नगराध्यक्षपदासाठी विद्या आनंदकर व मिनल भिंताडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नगराध्यक्ष उमेदवारी कोणाची ठेवावी यावर वेगवेगळ्या पध्दतीने चर्चा होती. निवडणुकीत जातीय राजकारणाचा घाणेरडेपणा पाहावयास मिळाला, असे शेलार म्हणाले.
-------
मी काही कोणाचे नाव घेऊन बोललो नाही. चित्रपटाचे नाव घेऊन बोललो. कोणाची बदनामी करण्याचा माझा उद्देश नव्हता. जर कोणाला माझे शब्द जिव्हारी लागले असतील तर माझाही नाईलाज आहे.
- आ. राहुल जगताप (राष्ट्रवादी)
---
१९ जागांसाठी ७१ उमेदवार रिंगणात
नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तीन, तर नगरसेवकपदाच्या १९ जागांसाठी ७१ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी १६२ पैकी ८८ जणांनी निवडणूक मैदान सोडले. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी पोटे, भाजपच्या सुनीता शिंदे, संभाजी ब्रिगेडच्या सिराजबी कुरेशी यांच्यात तिरंगी लढत होईल.

Web Title: "The politics of Pachapute like Bajirao Mastani film"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.