पोलिसांकडून आठ दारूभट्ट्या उद्ध्वस्त

By Admin | Published: July 12, 2017 04:33 AM2017-07-12T04:33:35+5:302017-07-12T04:33:35+5:30

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे पोलिसांनी गावठी दारूच्या आठ भट्ट्या उद्ध्वस्त केल्या़

Police devastated eight ammunition | पोलिसांकडून आठ दारूभट्ट्या उद्ध्वस्त

पोलिसांकडून आठ दारूभट्ट्या उद्ध्वस्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बारागाव नांदूर (जि. अहमदनगर) : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे पोलिसांनी गावठी दारूच्या आठ भट्ट्या उद्ध्वस्त केल्या़ पोलिसांची धाड पडल्याचे कळताच आरोपींनी मुळा धरणातील पाण्यात उड्या टाकून, तर काहींनी डोंगराळ भागात पलायन केले.
बारागाव नांदूर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सोमवारी पोलिसांनी धरण परिसरात छापे टाक ले़ पोलीस पथकाने चोरट्यांचा पाठलाग केला़ तसेच धरणाच्या ५२ खोल्या परिसरातील आठ दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या़ पोलिसांनी सिनेस्टाईलने आरोपींचा पाठलाग केला़ मात्र चोरट्यांनी पोलिसांच्या हाती तुरी देत पलायन केले़


 

Web Title: Police devastated eight ammunition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.