खते, औषध विक्रेत्यांचे अण्णांना साकडे; पारनेर तालुक्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 06:19 PM2017-11-07T18:19:18+5:302017-11-07T18:28:39+5:30

pesticide seller strike, anna hajare visit, | खते, औषध विक्रेत्यांचे अण्णांना साकडे; पारनेर तालुक्यात कडकडीत बंद

खते, औषध विक्रेत्यांचे अण्णांना साकडे; पारनेर तालुक्यात कडकडीत बंद

Next

निघोज : काही कंपन्यांच्या निकृष्ट दर्जाच्या औषधांमुळे अनेक शेतक-यांना प्राण गमवावे लागले याचा आम्ही निषेध करुन शनिवारी पारनेर तालुक्यातील खते, औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला.
सर्व औषध विक्रेत्यांना एकाच नजरेने पाहून चौकशीच्या नावाखाली अनेक गोष्टींचा त्रास होतो. बाजारपेठेतील डुप्लीकेट व नियमबाह्य औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा पारनेर तालुका सीड्स,पेस्टीसाईडस् अ‍ॅन्ड फर्टिलायझर्स डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल निचीत, उपाध्यक्ष सोपानराव वाळुंज, सचिव व जिल्हासंघटक सचिन वरखडे, गोविंद वाढवणे, विशाल माने, राहुल आहेर, अक्षय सातपुते, राहुल ढवण, तुषार बेलोटे, नामदेव पांढरकर, रवी लंके, शशांक चेडे, विलास शेळके आदी औषधे विक्रेत्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आ.विजय औटी, तहसिलदार भारती सागरे, पारनेर तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, राम जगताप यांना दिल्या आहेत.

Web Title: pesticide seller strike, anna hajare visit,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.