कामगारांना पेन्शनबरोबरच सर्व मुलभूत सुविधा देणार-बंडारू दत्तात्रेय : महाराष्ट्र राज्य पेंशनर्स संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 05:49 PM2017-08-13T17:49:17+5:302017-08-13T17:58:08+5:30

महाराष्ट्र राज्य पेंशनर्स संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचे उद्घाटन बंडारु दत्तात्रेय यांच्या हस्ते झाले.

Pensioners, association, convention, inauguration, | कामगारांना पेन्शनबरोबरच सर्व मुलभूत सुविधा देणार-बंडारू दत्तात्रेय : महाराष्ट्र राज्य पेंशनर्स संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन

कामगारांना पेन्शनबरोबरच सर्व मुलभूत सुविधा देणार-बंडारू दत्तात्रेय : महाराष्ट्र राज्य पेंशनर्स संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन

Next
कमत न्यूज नेटवर्कशिर्डी : महाराष्ट्राबरोबरच देशातील सर्व स्तरातील कामगारांना वाढीव पेन्शनबरोबरच, सर्वांसाठी घरे, आरोग्यदायी विविध सुविधा, जीवन सुरक्षा योजना, अटल पेंशन योजनेबरोबरच इतर सर्व मुलभूत सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी रविवारी येथे केले.महाराष्ट्र राज्य पेंशनर्स संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचे उद्घाटन बंडारु दत्तात्रेय यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार दिलीप गांधी, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते. बंडारू पुढे म्हणाले की, मी तुमच्यासारखाच एक कामगार आहे. त्यामुळे मला तुमच्या सर्व प्रश्नांची जाणीव असून, ते सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शासन कायमस्वरुपी आपल्या पाठिशी खंबिरपणे उभे आहे. आपल्या देशामध्ये स्त्री-पुरुष समानता असल्याकारणाने महिलांनीही कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये. पुरुषाबरोबरच महिलांनी विविध क्षेत्रात आपले नांव उंचवावे, असे आवाहन करुन त्यांनी सामाजिक स्तरावर काम करत असताना संघटनेला महत्व आहे. त्यामुळे 'हम साथ साथ है', 'सबका साथ, सबका विकास', याप्रमाणे देशाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे.'मेक इन इंडिया' च्या माध्यमातून आपण दिशादर्शक काम उभे करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला­. अटल पेंशन योजना, जीवन सुरक्षा योजनेबरोबरच केंद्र शासन व राज्यशासन राबवित असलेल्या विविध योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करतानाच अहमदनगरमध्ये कामगारांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.खासदार दिलीप गांधी यावेळी म्हणाले, आपला देश सुजलाम-सुफलाम करण्याची जबाबदारी ही देशातील प्रत्येक नागरिकांची आहे. ती जबाबदारी पार पाडण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. 'सबका साथ- सबका विकास' च्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांच्या विकासांसाठी एकत्रित काम करणार असल्याचे गांधी यांनी सांगितले. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवुणुकीसोबतच कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले­. अशोक राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी केले. यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते­.....

Web Title: Pensioners, association, convention, inauguration,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.