संगमनेर बसस्थानकात खासगी वाहनांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:06 PM2018-01-30T14:06:37+5:302018-01-30T14:06:58+5:30

वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गोपाळ उंबरकर व आगार प्रमुख राणी वर्पे यांनी बसस्थानकाच्या आवारात उभ्या केलेल्या खासगी वाहनांवर दंडात्मक सुरू केली आहे.

Penal action on private vehicles in Sangamner bus station | संगमनेर बसस्थानकात खासगी वाहनांवर दंडात्मक कारवाई

संगमनेर बसस्थानकात खासगी वाहनांवर दंडात्मक कारवाई

Next

संगमनेर : संगमनेर बसस्थानकाचे नुतनीकरण सुरू असून येथे खासगी चारचाकी व दुचाकी वाहने उभी केल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गोपाळ उंबरकर व आगार प्रमुख राणी वर्पे यांनी बसस्थानकाच्या आवारात उभ्या केलेल्या खासगी वाहनांवर दंडात्मक सुरू केली आहे.
बसस्थानकाचे नुतनीकरण सुरू असताना मालवाहू चारचाकी वाहने व बसेसला स्थानकात प्रवेश करताना येथे उभ्या केलेल्या खासगी वाहनांमुळे अडथळा होतो. यामुळे बसस्थानकाबाहेरही वाहतूक कोंडी झाल्याने छोटे-मोठे अपघात घडतात. प्रवाशांनाही यांचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ही कारवाई सुरू आहे. बसस्थानकात खासगी वाहने उभी केल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे आगारप्रमुख वर्पे यांनी सांगितले.

Web Title: Penal action on private vehicles in Sangamner bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.