खड्ड्यांचे नियमच खड्ड्यात

By मिलिंदकुमार साळवे | Published: August 26, 2017 07:08 PM2017-08-26T19:08:38+5:302017-08-26T19:17:40+5:30

रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी भारतीय रस्ते महासभेने ठरवून दिलेली मानके व नियमानुसार न बुजविता याबाबतच्या नियमांनाच सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खड्ड्यात घालीत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने रस्त्यांवरील डांबरी पृष्ठभागावर पडणारे खड्डे नियम व विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करूनच भरण्याचे आदेश नव्याने दिले आहेत. त्यासाठी डांबरी पृष्ठ भागावरील खड्डे भरण्यापूर्वी व भरल्यानंतरची छायाचित्रेच संकेतस्थळावर (नेटवर) टाकण्याचे आदेश दिले आहेत.

The patch rules are in the pits | खड्ड्यांचे नियमच खड्ड्यात

खड्ड्यांचे नियमच खड्ड्यात

Next
ठळक मुद्देरस्त्यांवरील खड्डे नेटवरखड्डे भरा, अपलोड करा
मदनगर : रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी भारतीय रस्ते महासभेने ठरवून दिलेली मानके व नियमानुसार न बुजविता याबाबतच्या नियमांनाच सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खड्ड्यात घालीत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने रस्त्यांवरील डांबरी पृष्ठभागावर पडणारे खड्डे नियम व विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करूनच भरण्याचे आदेश नव्याने दिले आहेत. त्यासाठी डांबरी पृष्ठ भागावरील खड्डे भरण्यापूर्वी व भरल्यानंतरची छायाचित्रेच संकेतस्थळावर (नेटवर) टाकण्याचे आदेश दिले आहेत.‘लोकमत’ने गेल्या महिनाभरापासून अहमदनगरमधून नियमांचे उल्लंघन करुन होणारी अवजड वाहतूक व त्यामुळे अहमदनगर-मनमाड महामार्गासह शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत आवाज उठविला होता. आता राज्य सरकारनेच राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गुरूवारी अहमदनगर-मनमाड रस्त्यावर सावेडी थांब्यापुढील पेट्रोल पंपासमोर एक ट्रॅक्टर आला. त्यात खडी होती. त्याला जोडूनच मागे डांबर गरम करण्याचे मशिन होते. सोबत पिवळे जाकीट घातलेले मजूर. हा ताफा रस्त्यावर आला. रस्त्यावरील खड्डा थोडा स्वच्छ केला. त्यात डांबर ओतले. वरून खडी टाकली. अन् पुन्हा वरून डांबर. खड्डा बुजवून हा ताफा पुढे गेला. अशाच पद्धतीने नगरपालिका,महानगरपालिका व ग्राम पंचायत हद्दीतही खड्डे बुजविले जातात. पण डांबरी पृष्ठभाग असणाºया रस्त्यांवरील खड्डे कशा पद्धतीने बुजवावेत, याबाबत भारतीय रस्ते महासभा व सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना व निर्देश दिलेले आहेत. तसेच पण या सूचना व निर्देशांचे कुठेच पालन होताना दिसत नाही.जुन्या सूचना व मार्गदर्शक निर्देशांसोबतच आता नव्या तंत्रज्ञानाचा रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित रस्त्यांवरील पडणारे खड्डे डांबर मिश्रीत खडीने भरण्यापूर्वी खड्ड्यांची छायाचित्रे घेऊन तसेच खड्डे भरल्यानंतर त्याच खड्ड्याच्या ठिकाणची छायाचित्रे घ्यावीत. खड्डा भरण्याअगोदर व नंतरची ही छायाचित्रे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर कामनिहाय अपलोड करण्याचे आदेश राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत. विभागाचे उपसचिव प्रकाश इंगोले यांनी २३ आॅगस्टला बांधकाम विभागाच्या राज्यातील सर्व प्रादेशिक विभागांच्या मुख्य अभियंत्यांना याबाबत परिपत्रक पाठवून त्यांचे याकडे लक्ष वेधले आहे. ............................

Web Title: The patch rules are in the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.