माजी आमदार गडाख यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 04:33 PM2019-03-16T16:33:14+5:302019-03-16T16:33:20+5:30

वडाळा बहिरोबा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केलेल्या चक्का जाम आंदोलन प्रकरणी

The order to present former MLA Gadak to the court | माजी आमदार गडाख यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश

माजी आमदार गडाख यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश

Next

नेवासा : वडाळा बहिरोबा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केलेल्या चक्का जाम आंदोलन प्रकरणी दाखल गुन्ह्यात नेवासा न्यायालयाने माजी आमदार शंकरराव गडाख व जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांच्याविरूद्ध पकड वॉरंट काढले आहे. शनिवारी (दि़ १६) या दोघांना हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
वडाळा बहिरोबा येथील रास्ता रोको व चक्का जाम आंदोलन प्रकरणी १४ आॅगस्ट २०१७ रोजी नेवासा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३४१, १४३, १४९ व १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानुसार शंकरराव गडाख व सुनील गडाख यांना १६ मार्चला न्यायालयात हजर करावे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोनई पोलिसांना बजावला आहे.

Web Title: The order to present former MLA Gadak to the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.