One killed in motorcycle accident; One injured | मोटारसायकल अपघातात एक ठार; एक जखमी
मोटारसायकल अपघातात एक ठार; एक जखमी

टाकळीभान : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर भोकर शिवारात मोटारसायकल-बोलेरोची समोरासमोर धडक होवून झालेल्या मोटारसायकल अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. तर सोबत असलेली सहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान टाकळीभानकडून श्रीरामपूरकडे जात असलेल्या टिव्हीएस मोटारसायकल क्र.एम.एच.१७,डब्ल्यू.६३३८ हिची श्रीरामपूरकडून नेवासाकडे जात असलेल्या बोलेरो क्र.एम.एच.१४, सी.के. ०१३३ यांची समोरासमोर धडक झाली. यात मोटारसायकल चालक अनिल योसेफ शिणगारे (वय ३५) रा.अव्वलगाव हा जागीच ठार झाला. सोबत असलेली मुलगी अश्विनी शिणगारे ही गंभीर जखमी झाली. जखमी मुलीला नगर येथे सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

 


Web Title:  One killed in motorcycle accident; One injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.