Nitin Gadkari faints on stage at university convocation in Maharashtra | चक्कर कशामुळे आली?; खुद्द नितीन गडकरींनीच सांगितलं कारण
चक्कर कशामुळे आली?; खुद्द नितीन गडकरींनीच सांगितलं कारण

ठळक मुद्देदीक्षांत समारंभावेळी नितीन गडकरी यांना आली चक्करकॉन्व्होकेशन गाऊनमुळे त्यांचा श्वास गुरमरला नितीन गडकरींची प्रकृती स्थिर

अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ का आली?. यामागील कारण समोर आले आहे. दीक्षांत समारंभासाठी घातलेल्या कॉन्व्होकेशन गाऊनमुळे त्यांचा श्वास गुरमरल्यासारखं झाले. यामुळेच भोवळ आली, अशी माहिती स्वतः नितीग गडकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी विशिष्ट प्रकारचा गाऊन परिधान करावा लागतो. या पोशाखामुळे गडकरी यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यातच हा समारंभ एका बंदिस्त सभागृहात झाल्याने त्यांचा श्वास गुदमरू लागला. श्वास गुदमरल्यानं भोवळ आल्याचे गडकरी यांनी सांगितले. यापूर्वीही, कॉन्व्होकेशन गाऊनमुळे असा प्रसंग एक-दोन वेळा घडल्याचंही त्यांनी सांगितले. दरम्यान, गडकरी यांचा रक्तदाब व साखर यावेळी नियमित होती, अशी माहिती समोर आली आहे. 

(राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने नितीन गडकरी रुग्णालयात)


नेमके काय घडले?

दरम्यान, राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने नितीन गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना अचानक चक्कर आली, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. दरम्यान, नितीन गडकरींची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी नितीन गडकरी आले होते. यावेळी त्यांनी भाषणही केले. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने गडकरी कोसळले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या राज्यपालांनी गडकरींना सावरले. तसेच डॉक्टरांनी तातडीने गडकरी यांची तपासणी केली. त्यानंतर गडकरी यांना रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर नितीन गडकरींचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच गडकरी यांना विशेष विमानाने नागपूर येथे नेण्यात येणार आहे. 

नितीन गडकरींच्या प्रकृतीची विजय दर्डा यांनी केली विचारपूस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राहुरी येथील कार्यक्रमात चक्कर येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, 'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी नितीन गडकरी यांच्या प्रकृतीची फोन करून विचारपूस केली. यावेळी पदवीदान कार्यक्रमावेळी परिधान केलेला कॉन्व्होकेशन ड्रेस आणि तिथे मोठ्या प्रमाणात असलेली गर्दी यामुळे चक्कर आल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच आपली प्रकृती आता स्थिर असल्याची  माहितीही त्यांनी दिली.  


Web Title: Nitin Gadkari faints on stage at university convocation in Maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.