नगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 08:16 PM2019-03-01T20:16:27+5:302019-03-01T20:17:08+5:30

जयंत पाटील यांचा दावा : माध्यमांच्या बातम्या चुकीच्या असल्याचे केले ट्वीट

NCP will fight the Nagar seat | नगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार

नगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार

Next

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला सोडल्याचे पत्रकारांना सांगितले. मात्र, ते उपरोधिक बोलले की घोषणा केली याबाबत संभ्रम निर्माण झाला असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरची जागा राष्ट्रवादीच लढविणार असल्याचा खुलासा ट्वीटरवर केला आहे.
अकलूज येथे शुक्रवारी मेळाव्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आले होते. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते पत्रकारांशी ते बोलत होते. ‘नगरची जागा काँग्रेसला सोडणार का?’ या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले़ ‘काँग्रेस.. काँग्रेस’ असे शरद पवार पुटपुटले. त्यावर सर्व माध्यमांनी नगरची जागा काँग्रेसला सोडणार असल्याच्या बातम्या केल्या. या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीटरवर खुलासा करीत नगरची जागा राष्ट्रवादीच लढविणार असल्याचे सांगितले आहे.

Web Title: NCP will fight the Nagar seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.